माशांची इत्थंभूत माहिती असल्याने शेतकऱ्यांना उपयुक्त

माशांची इत्थंभूत माहिती असल्याने शेतकऱ्यांना उपयुक्त

rat११४०.txt

बातमी क्र.. ४० (पान २ साठी)
(टीप- सकाळचा सहभाग होता.)

-rat११p३५.jpg-
२३M१५४४४
रत्नागिरी ः डॉ. विजय जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर डॉ. आशिष मोहिते, श्रीकृष्ण साबणे, साबणे, डॉ. जोशी, सुनेत्रा जोशी व कुटुंबीय.
-----------

माशांची माहिती शेतकऱ्यांना उपयुक्त

संदीप अहिरराव ; डॉ. विजय जोशी यांच्या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन

रत्नागिरी, ता. ११ ः मत्स्य महाविद्यालय माजी अधिष्ठाता, शास्त्रज्ञ डॉ. विजय जोशी हे माझे गुरू आहेत. त्यांनी लिहिलेल्या हिंदी पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक माशाबद्दल वेगळी माहिती दिली आहे. प्रत्येक माशाची वाढण्याची पद्धत, खाण्याची पद्धत, तलावाचा प्रकार या गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या इतर कुठेही कुठल्याही पुस्तकात सांगितलेल्या नाहीत त्या डॉ. जोशी यांनी सांगितल्या आहेत. त्यामुळेच विशिष्ट प्रकारच्या माशांची शेती करताना हे पुस्तक मत्स्य शेतकऱ्याला उपयोगी पडेल, असे प्रतिपादन ग्रोव वेल इंटरनॅशनल फिड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संदीप अहिरराव यांनी अध्यक्षस्थानावरून केले.
डॉ. जोशी यांनी हिंदीमध्ये लिहिलेले पुस्तक मिठे जलमें मछली पालन या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यात ते बोलत होते. डॉ. जोशी यांच्या निवासस्थानी कार्यक्रम झाला. या वेळी मत्स्यक्षेत्रातील काही मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. मुंबईच्या नवचैतन्य प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केले. लेखक डॉ. जोशी यांनी या पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगितली. साताऱ्याचे उद्योजक किरण जोशी म्हणाले, हे पुस्तक म्हणजे मत्स्यशेतीचे बायबल आहे. विशेष पाहुणे ''सकाळ'' माध्यम समुहातील एसआयआयएलसी प्रशिक्षण विभागाचे प्रमुख अमोल बिरारी म्हणाले, डॉ. जोशी यांचा ''सकाळ'' समुहाबरोबर मागील २० वर्षांचा ऋणानुबंध आहे. अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. हे पुस्तक हिंदीमध्ये असल्याने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगालमधील मत्स्य शेतकऱ्याला उपयोगी ठरेल.
या वेळी प्रमुख पाहुणे नाबार्डचे प्रमुख (उत्तराखंड) चीफ जनरल मॅनेजर विनोद बिष्ट, संभाजीनगरचे डॉ. प्रथमेश जोशी, डॉ. त्रिवेदी डायरेक्टर ऑफ फिशरीज (उत्तराखंड), प्रमोद कुमार शुक्ला (डेप्युटी डायरेक्टर ऑफ फिशरीज, उत्तराखंड), अभय देशपांडे (डेप्युटी डायरेक्टर फिशरीज, महाराष्ट्र), पाठक (डीजीएम नाबार्ड) मान्यवर उपस्थित होते. मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन पल्लवी गोडसे, प्रास्ताविक सुनेत्रा जोशी यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिकेत कोनकर, परेश गुरव आणि सुनेत्रा जोशी यांनी विशेष सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com