रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

-rat11p17.jpg- KOP23M15387 रत्नागिरी ः प्रामाणिकपणाबद्दल तनिष कारकरचे कौतुक करताना मुख्याध्यापिका अश्विनी केळकर आणि शिक्षक सत्यवान गायखे.
-----------

सोन्याची रिंग केली विद्यार्थ्याने परत
रत्नागिरी ः तालुक्यातील भावेआडोम कारकरवाडी नं. 2 या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनीची हरवलेली सोन्याची रिंग तनिष गणपत कारकर या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे शिक्षकांकडे सुपूर्द केली. याबद्दल त्याचा शाळेत सत्कार करण्यात आला. एकता मनोहर गावडे या विद्यार्थिनीची सोन्याची रिंग हरवली. ही रिंग शाळेत खेळताना पडली. ही रिंग सापडल्यानंतर तनिषने ती प्रामाणिकपणे शिक्षकांकडे परत केली. याबद्दल तनिषचे कौतुक मुख्याध्यापिका अश्विनी केळकर, शिक्षक सत्यवान गायखे यांनी केले.

बियाणी बालमंदिरमध्ये पालक सभा
रत्नागिरी ः बियाणी बालमंदिरामध्ये पालक सभा झाली. या वेळी मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी बालकांचा सर्वांगीण विकास आणि संस्कारक्षम पिढी घडवण्याच्यादृष्टीने बालमंदिर सदैव प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही पालकांना दिली. बालमंदिरमध्ये घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती आसावरी पावसकर यांनी दिली. हसतखेळत शिक्षण आणि शालेय कामकाजाचे नियोजन या विषयीची माहिती आयुषी विचारे यांनी दिली. अपर्णा गोगटे यांनी पालक प्रतिनिधी मंडळाची गरज आणि त्याचे कामाचे स्वरूप याबाबत माहिती सांगितले. पालक प्रतिनिधी मंडळाची निवड करण्यात आली. प्रतिनिधी मंडळाच्या उपाध्यक्षपदी प्रमोद तेरेदेसाई व उमेश जोशी यांची निवड केली. शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत घवाळी, प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संस्था सदस्य श्रीकृष्ण दळी, राजेंद्र कदम, संतोष कुष्टे, संजय चव्हाण, भारत शिक्षण मंडळाचे खजिनदार सीए नचिकेत जोशी उपस्थित होते.


खेम धरण भरल्याने
हर्णैमधील पाणीपुरवठा सुरळीत
दाभोळ ः जानेवारी महिन्याच्या अखेरीला खेम धरणातील पाणीसाठा आटल्याने हर्णै गावाला जॅकवेमधून होणारा पाणीपुरवठा बंद पडला होता. तब्बल 5 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता मुसळधार पावसाच्या पाण्याने धरण 100 टक्के भरल्याने 6 जुलैपासून गावाला नियमितपणे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. हर्णै येथील खेम धरणातील पाणीसाठा हा दरवर्षी डिसेंबर ते जानेवारीदरम्यान आटतो. त्यामुळे येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा हा बंद पडतो; मात्र हर्णै गावासाठी बांधतिवरे येथून दुसरी पाणीपुरवठा योजना असल्याने नागरिकांची फारशी गैरसोय होत नाही; मात्र या वेळी पाऊस एक महिना उशिरा आल्याने हर्णैमध्ये पाणीटंचाईचे सावट घोंगावले होते. हे धरण बांधल्यापासूनच गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा सुरू करताना येथे सत्यनारायणाची महापूजा केली जाते. ही परंपरा फार जुनीच आहे. त्या परंपरेनुसार पाणीपुरवठा सुरू करताना सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. खेम धरण परिसराला पावसाळ्यात पर्यटनस्थळाचे स्वरूप येते. दररोज या ठिकाणी अनेक नागरिक भेट देतात व तेथे स्नानाचा आनंद लुटतात. तेथेच जेवण तयार केले जाते व दिवसभर वेळ घालवला जातो.


विरसई शाळेत साहित्याचे वाटप
दाभोळ ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी आदर्श शाळा विरसई येथे पालक सभेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी विरसई जनसेवा मंडळाकडून शासन निकषानुसार गणवेश अनुदान पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. दीपक भागणे यांच्या सहकार्यातून विआन शेट्टी व समारा शेट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य (विज्ञान प्रयोगवह्या, चौकट वह्या, चित्रकला वह्या, चौरेघी वह्या, साध्या 200 व 10 पेजेस वह्या, कंपास बॉक्स, शिसपेन्सिल) उर्वील राणे यांसकडून वॉटरकलर सेट, बाबूभाई मित्तल यांसकडून क्रेयॉन कलर सेट, जयचंद मिश्रा यांसकडून छत्र्या असे साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच मनोरमा राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पिंपळकर, प्रभारी केंद्रप्रमुख दिनकर क्षीरसागर व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com