क्राईम

क्राईम

Published on

३३ (पान ३ साठी)

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुलाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला मद्य प्राशन करणाऱ्या दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश संतोष संसारे (वय ३०) व करण अर्जून गोसावी (वय २९) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. ९) रात्री निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
--------

अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी
संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी ः रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. तौसिफ आसिफ मिरजकर (वय ३६, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार १४ मे २०२३ रोजी दुपारी रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात निदर्शनास आला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबालकर यांनी या जामीन अर्जावर निकाल दिला. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. अनिरुद्ध फणसेकर यांनी काम पाहिले. रेल्वेस्टेशन परिसरात अंमली पदार्थ खरेदी -विक्री करण्याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस पथक रेल्वेस्टेशन येथील पार्सल गेटमधून पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित संशयास्पद आढळला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २१.७८ ग्रॅम ब्राऊन शुगर, हेरॉईन हा अंमलीसदृश पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या स्थितीत सापडला. संशयिताने न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता.
-------------
धामणंदच्या महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू

खेड ः तालुक्यातील धामणंद-जाधववाडी येथील शर्मिला शिवाजी जाधव या ४८ वर्षीय महिलेस उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वावे ते कामथे प्रवासादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही महिला आजारी असल्याने तिला उपचारासाठी वावे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना कामथे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
----------

तिसंगीत दारूधंद्यावर छापा

खेड ः तालुक्यातील तिसंगी-खोपकरवाडी बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू गाळत असताना येथील पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात रंगेहाथ पकडले. रोशन सुभाष भोसले असे संशयिताचे नाव आहे. त्याने गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जवळ बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी हातभट्टीची दारू गाळत असताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------

विसापूरमधील दारू अड्ड्यावर छापा

दाभोळ ः दापोली तालुक्यामधील विसापूर येथे पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलैला संशयित प्रवीण दाभो हा विसापूर येथील एका नाल्याच्या पलीकडे निर्जनस्थळी असणाऱ्या घराच्या बाजूला पत्र्याच्या शेडखाली हातभट्टीची दारू तयार करत होता. दापोली पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे २६ हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल विकास पवार यांनी खबर दिली.
-------

भोममधील प्रौढाचा नदीत बुडून मृत्यू

चिपळूण ः तालुक्यातील भोम वरचीवाडी येथील प्रौढाचा कात्रोळीतील नदीतून जाताना वाहून जाऊन मृत्यू झाल्याची घटना ५ जुलैला घडली. त्यांचा मृतदेह कात्रोळी कळमुडकरवाडी जवळील नदीपात्रात सोमवारी आढळून आला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदानंद यशवंत चव्हाण (४५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते भोम येथून कात्रोळी येथे त्यांचे मामा विजय बाबूराव जाधव यांच्या घरी नदी ओलांडून जात होते. त्याचवेळी ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले. याबाबतची फिर्याद ८ जुलैला येथील पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार त्यांचा शोध घेतला असता सोमवारी (ता.१०) कात्रोळी कळमुंडकरवाडी येथे मृतदेह आढळून आला.
---------

सावर्डेतील जुगार अड्ड्यावर छापा

चिपळूण ः जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर छापासत्र सुरू असतानाचा सावर्डे येथे दुकान टपरीत बेकायदा चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्याची घटना १० जुलैला सकाळी घडली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित अनंत मोरे (३८) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १८३२ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.