वारसांची मदत आली, वाटप रखडले

वारसांची मदत आली, वाटप रखडले

Published on

४७ (पान ३ साठी)

वारसांची मदत आली, वाटप रखडले

आसूदमधील अपघात ; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

दाभोळ, ता. ११ ः दापोली हर्णै मार्गावरील आसूद जोशी आळी येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या वारसांना शासनाने ५ लाखांची मदत जाहीर केली होती. या मदतीची रक्कम शनिवारी (ता. ८) तहसीलदार दापोली यांच्या बँकखात्यात जमा होऊनही तिचे वाटप वारसांना करण्यात न आल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष हृषिकेश गुजर यांनी तहसीलदार अर्चना बोंबे यांची भेट घेऊन उद्यापर्यंत वारसांना मदतीचे धनादेश न पोचल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
२५ जूनला झालेल्या अपघातात डमडम चालक अनिल सारंग (वय ४५), संदेश कदम (५५), स्वरा संदेश कदम (८), मारियम काझी (६), फराह काझी (२७) तर मीरा महेश बोरकर (वय २२), वंदना चोगले (३४) यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर काही दिवसांनतर मुंबई येथे उपचार सुरू असताना भूमी सावंत हिचेही निधन झाले. या अपघातात सहा जण जखमी झाले होते. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख मदत व जखमी झालेल्यांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
दापोली तहसीलदारांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होऊनही ती अद्याप वारसांना देण्यात न आल्याने आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुकाप्रमुख हृषिकेश गुजर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, दापोलीच्या नगराध्यक्ष ममता मोरे, दापोली नगरपंचायतीचे शिवसेना राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, आरिफ मेमन, महेबुब तळघरकर, अझीम चिपळूणकर, अश्विनी लांजेकर, रिया सावंत, अन्वर रखांगे, संतोष कळकुटके व शिवसेना पदाधिकारी उमेश शिंदे यांनी तहसीलदार अर्चना बोंबे यांची भेट घेतली.
-----

धनादेश देण्याची कार्यवाही सुरू

तहसीलदार बोंबे यांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांचे त्यांच्या बँकखात्यातील नावानुसार चेक देण्यात येणार आहेत. त्याची माहिती जमा केली जात असून आज चेक तयार करून ते वारसांना देण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.