''रामगड'' परिसराने घेतला मोकळा श्वास

''रामगड'' परिसराने घेतला मोकळा श्वास

swt1125.jpg
M15517
मालवणः मोहिमेनंतर स्वच्छ झालेला रामगडाचा परिसर.

‘रामगड’ परिसराने घेतला मोकळा श्वास
स्वच्छता मोहिमेस प्रतिसादः दुर्गवीर प्रतिष्ठानचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ११ः स्वराज्याचा कारभार ज्या गडकिल्ल्यांवर चालला, तो ऐतिहासिक वारसा जतन व्हावा व पुढील पिढ्यांसाठी टिकून रहावा, या उद्देशाने दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे काल (ता. १०) येथील रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेच्या सुरुवातीला सकाळी आठ वाजता गडदेवता, श्री गणेशाची आराधना करून शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र घेऊन मोहिमेस प्रारंभ केला. पावसाचे दिवस असल्यामुळे गडांवरील वास्तू, अवशेष यांवर गवत-झाडी उगवल्याने वास्तू झुडपात झाकून जातात. यामुळे वास्तूंचे नुकसान होतेच, शिवाय पावसाळ्यात गडावर येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण गडफेरी होत नाही. या गोष्टीची दखल घेऊन या मोहिमेत गडावरील गणेश मंदिर परिसरातील झाडी-गवत साफ करत मंदिर परिसर मोकळा करण्यात आला. या मोहिमेमध्ये ‘दुर्गवीर’चे मिलिंद चव्हाण, गणेश मालंडकर, तुषार चव्हाण, सुबोध चव्हाण, रोहन साटम, ग्रामस्थ भालचंद्र पवार, प्रमोद मगर आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न ज्या गड-किल्ल्यांनी सत्यात उतरवले, स्वराज्याचा कारभार ज्या गडकिल्ल्यांवर चालला, तो ऐतिहासिक वारसा जतन व्हावा व पुढील पिढ्यांसाठी टिकून राहावा, यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान २००८ पासून अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. गडकिल्ले संवर्धनासोबतच विविध सामाजिक उपक्रम आणि पारंपरिक मराठमोळे सण-उत्सव गडावर साजरे करून गड जागता ठेवत स्थानिकांमध्ये गडांबद्दल आस्था निर्माण करण्याचा दुर्गवीर प्रतिष्ठानचा संकल्प आहे. या कार्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून सर्व गडप्रेमी आणि शिवप्रेमींनी या गडसंवर्धन कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com