-कळवंडे धरणाच्या दुरुस्तीनंतर पिचिंग खचले

-कळवंडे धरणाच्या दुरुस्तीनंतर पिचिंग खचले

९ (पान ३ साठी)


-RATCHL११२.JPG ः
२३M१५५१३
चिपळूण ः कळवंडे धरणात दुरुस्तीच्या ठिकाणी केलेले प्लास्टिकचे अच्छादन.
---------

कळवंडे धरणाची पावसानंतर दुरुस्ती

ग्रामस्थांमध्ये रोष ; धोका नसल्याचे अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

चिपळूण, ता. ११ ः तालुक्यातील कळवंडे येथील धरणाची दुरुस्ती झाल्यानंतर काही दिवसातच तेथील पिचिंग खचले. यातून धरणाला धोका असल्याचा संभव असल्याने ग्रामस्थांचा रोष वाढू लागला आहे. खचलेल्या भागात लघु पाटबंधारे खात्याने नवीनच प्रयोग केला आहे. धरणाच्या मुख्य भिंतीला मधोमध प्लास्टिक टाकून त्यावर गोण्या ठेवल्या आहेत. धरणाची पूर्ण दुरुस्ती झाल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सध्या धरणात किरकोळ पाणीसाठा ठेवला आहे.
तालुक्यात कळवंडे येथील धरणक्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. धरण झाल्यानंतर येथील शेतकऱ्यांना चांगला फायदाच झाला आहे; मात्र सध्याच्या स्थितीला मर्जीतील ठेकेदारास काम देऊन ते निकृष्ट झाल्याने ग्रामस्थांचा रोष वाढला आहे. ४९ लाखांच्या दुरुस्तीचे काम कळवंडे धरणामध्ये काढण्यात आले. एप्रिल महिन्यात संबंधित ठेकेदाराने हे काम केले. मात्र, पहिल्याच पावसात धरणाचे पिचिंग खचले. यानंतर कळवंडे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर उद्योजक दादा उदेग यांच्या मार्गदर्शनाखाली कळवंडे दत्तवाडी येथे बैठक घेण्यात आली व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विपुल खोत यांनी धरणाला कोणताही धोका नाही. पावसाचा जोर कमी होताच संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती केली जाईल. खचलेल्या भागात प्लास्टिक टाकून माती भरण्यात येईल, असे आश्वासन दिले. या शिवाय धरणाला कोणताही धोका नाही. ऑगस्टनंतर धरण भरण्यात येईल, असेही सांगितले.
गेले आठ दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने धरणाच्या खचलेल्या भागाचे काम सुरू केले व माती टाकून पिचिंग केले. या शिवाय त्यावर प्लास्टिक टाकून मातीने भरलेल्या गोणी ठेवण्यात आल्या आहेत. मुळात जो भाग खचला तो भिंतीच्या मधोमध आहे. त्यामुळे धरणाच्या भिंतीवर प्लास्टिक टाकून पाटबंधारे विभागाने अभियांत्रिकी क्षेत्रात नवीन जावईशोध लावल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्लास्टिकचे अच्छादन असतानाही पाटबंधारे विभाग धरणाच्या मजबुतीबाबत हमी कशी देते, असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पुढच्या वर्षी धरण असेच रिकामे ठेवल्यास या भागात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. ग्रामस्थांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
----------
कोट
कळवंडे धरण दुरुस्तीचे काम आता पूर्णत्वास गेले आहे; मात्र लगेचच धरण पूर्ण क्षमतेने भरले जाणार नाही. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात धरणात पुरेसा पाणीसाठा केला जाईल.
- विपुल खोत, उपकार्यकारी अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com