नातेवाइकांचा काळीज चिरणारा आक्रोश

नातेवाइकांचा काळीज चिरणारा आक्रोश

२८ (पान ३ साठी)

नातेवाइकांचा काळीज चिरणारा आक्रोश

बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले ; नागरिकांचाही अश्रूचा बांध फुटला

मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः कुंभार्ली येथे वाशिष्ठी नदीत आपली दोन तरुण मुले बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या मुलांच्या नातेवाइकांचा आक्रोश सुरू होता. २४ तासानंतर बेपत्ता तरुणांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांचा पुन्हा काळीज चिरणारा आक्रोश सुरू झाला. माझा कादिर... माझा अतिक... उठ ना रे बाबा...त्या निपचित पडलेल्या मृतदेहांना उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न नातेवाईक करत होते. त्यांना माहीत होते की, हे पुन्हा येणार नाहीत; पण शेवटचा प्रयत्न करत असावेत. बहुदा.... नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांचाही अश्रूचा बांध फुटला.
चिपळूण शहरातील आठ मुले एकत्रितपणे पावसाळी आनंद घेण्याच्या उद्देशाने कुंभार्ली गणेशवाडी येथील वजहर या ठिकाणी आले होते. यातील दोघे डोहात आंघोळ करत असताना अचानक डोहातील पाण्याची पातळी वाढली. तेथील भोवऱ्यात अतिक इरफान बेबल (बेबल मोहल्ला), अब्दुल कादीर नोशाद लासने (जिव्हाळा सुपर बाझार शेजारी, चिपळूण) हे दोघेही सापडले. काही क्षणात ते दोघेही गायब झाले. त्यानंतर रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत २४ तासात या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. काही धाडसी तरुणांनी डोहात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. महाड येथील एसआरटीचे पथक, कोस्टल गार्डचे पथक त्या दोघांचा शोध घेत होते. अब्दुल कादीर आणि अतिकचे नातेवाईक तर डोळ्यात अश्रू घेऊन हंबरडा फोडत नदीकिनारी बसले होते. सायंकाळी या दोघांचे मृतदेह शिरगावच्या नदीत सापडले. शिरगावमध्ये मृतदेह सापडल्याचे समजले नंतर नातेवाईक हंबरडा फोडत त्या ठिकाणी पोहोचले. दोन्ही मृतदेह एका रांगेत ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी नातेवाइकांचा आक्रोश सुरू होता. रात्री उशिरा दोन्ही मुलांवर दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------
कोट
आम्ही दोन्ही मुलांच्या नातेवाइकांचे सांत्वन करायला गेलो. ज्यांनी आपले वृद्धापकालातील आधार गमावले त्यांना धीर तरी कसा द्यायचा, असा प्रश्न आमच्यासमोर होता.
- नाझिम अफवारे, अध्यक्ष, चिपळूण तालुका मुस्लिम समाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com