स्थानिक एसआयएलसी

स्थानिक एसआयएलसी

Published on

सकाळ (कोल्हापूर) ता: १२ जुलै, बुधवार प्रसिद्धीसाठी बातमी

SIILC च्या लोगोसह वापरावी
----------------------------------------------------

मोबाईल फिल्म मेकिंग प्रशिक्षण

कोल्हापूर, ता. ११ : तंत्रज्ञानाच्या रोजच्या बदलत चाललेल्या जगात चित्रपटसृष्टीत देखील अनेक बदल दिवसेंदिवस होत आहेत. सध्या आपल्या जवळील स्मार्टफोनद्वारे आपण लघुपट, जाहिराती, माहितीपट आदी प्रकारच्या फिल्म बनवू शकतो. सध्या मोबाईलमध्ये हाय रिझोल्युशन कॅमेरा आणि विविध एडिटिंग ॲप्स मुळे मोबाईलद्वारे आता सिनेमाही शूट करता येतो. एखाद्या व्यक्तीतील सर्जनशीलता व सिनेमा तयार करण्याचे स्वप्न आता बजेट परवडत नाही म्हणून अपूर्ण राहणार नाही. त्यासाठी त्या तंत्रज्ञानाचे आवश्यक ज्ञान असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर २१, २२ व २३ जुलै रोजी ‘मोबाईल फिल्म मेकिंग’ हे तीन दिवसांचे प्रशिक्षण होत आहे. या प्रशिक्षणात मोबाईल फिल्म मेकिंगची तत्वे, पद्धती, प्रकार, नियोजन आदी विषयांवर दिग्दर्शक शिवाजी कचरे हे मार्गदर्शन करतील. लघुपटनिर्मितीची एकंदर प्रक्रिया व त्यासाठी लागणारी कथा, पटकथा, निर्मिती, संकलन, कलादिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य आदी बाबींबद्दलही मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान लघुपट निर्मिती केली जाणार आहे.

शुल्क- प्रतिव्यक्ती पाच हजार रुपये
कार्यशाळेचे ठिकाणः ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिरजवळ, कोल्हापूर
संपर्क: ९८८१०९९४२६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.