‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांची 
बापर्डे ग्रामपंचायतीस भेट

‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांची बापर्डे ग्रामपंचायतीस भेट

15538
बापर्डे : ग्रामपंचायतीला विद्यार्थ्यांनी भेट दिली.

‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांची
बापर्डे ग्रामपंचायतीस भेट
देवगड : इंडोजर्मन प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षण घेत असलेल्या एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीला भेट दिली. विविध माहिती त्यांनी जाणून घेतली. भेट दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आभिजित काळे, देवांशी जैन, कार्तिक जाधव, प्रियसी शहा, सिद्धांत वर्तक, सौम्या व्यंकटेशन व सर्वेश साळगावकर यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी बापर्डे ग्रामपंचायतीला भेट दिली. या भेटी दरम्यान ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्याबाबतीत केलेल्या कामांची पाहणी केली. ग्रामपंचायतीने राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना भेट देत समाधान व्यक्त केले. यावेळी बापर्डेचे सुपुत्र सुहास राणे, बापर्डे गावचे सरपंच संजय लाड, बापर्डे सोसायटी अध्यक्ष अजित राणे, बाबुराव राणे, प्रज्ज्वल गायकवाड आदी उपस्थित होते.
....................
15534
आप्पा लुडबे

वायरी कामांबाबत पालकमंत्र्यांना साकडे
मालवण : शहरातील वायरी प्रभागातील विकासकामांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. आडवण भागातील गणेश विसर्जन स्थळ हे रस्त्यालगत असून खोल आहे. ते बांधणे आवश्यक आहे. तसेच ते वस्ती लगत असल्याने सुशोभीकरणाचीही आवश्यकता आहे. मुस्लिम मोहोल्ल्यालगत कब्रस्थान असून या कब्रस्थानात वज्रखाण्याची इमारत नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. याच्या बांधकामासाठी मागील चार वर्षे पाठपुरावा करूनही अल्पसंख्यांक निधी न मिळाल्याने हे काम होऊ शकले नाही. या दोन्ही कामांसाठी जिल्हा नियोजनमधून निधी द्यावा, अशी मागणी लुडबे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com