-लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

-लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

Published on

४१ (पान ३ साठी)

लग्नाचे आमिषाने महिलेवर अत्याचार

चिपळूण, ता. ११ ः एका विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर संबंधित महिलेशी लग्न करण्यास नकार देणाऱ्या तरूणावर येथील पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शोएब बरकत कटमाले असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित विधवा ही आपल्या कुटुंबासमवेत राहते. पती आजारी झाला अन त्याचे २०१८ ला निधन झाले. त्यानंतर पीडित महिला काम करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करत आहे. या कालावधीत संशयित शोएब कटमाले याची तिच्याशी ओळख झाली. या वेळी तो परदेशात नोकरीला होता. तो परत आल्यानंतर त्याने पीडित विधवेशी ओळखीचा फायदा घेतला. शोएब याने तिला विवाह करण्याचे आमिष दाखवत त्याने त्या विधवेवर वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी पीडित विधवेने येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार कटमाले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.