पिंगुळी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर
कारभारात अनियमिततेचा ठपका

पिंगुळी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारभारात अनियमिततेचा ठपका

पिंगुळीचे ग्रामविकास अधिकारी
अनियमित कारभारामुळे निलंबित

चौकशी अहवालानुसार सीईओंकडून कारवाई

ओरोस, ता. ११ ः ग्रामपंचायत कारभारात अनियमितता तसेच दप्तर अपूर्ण ठेवणे, दप्तरात त्रुटी ठेवणे, अशा विविध प्रकारचा ठपका ठेवत पिंगुळी (ता.कुडाळ) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी उमेश खोबरेकर यांना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी निलंबित केले. गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिलेल्या चौकशी अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामसेवक खोबरेकर यांच्या पिंगुळी ग्रामपंचायतमधील कारभाराची कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. याचा चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांना दिला आहे. त्यात ग्रामपंचायत दप्तर तपासणीमध्ये अपूर्ण आढळले असून दप्तरात अनियमितता आहे. तसेच त्रुटीही आढळल्या आहेत. खरेदी साहित्याचा साठा नोंदवहीत नोंद नसून त्याचा विनियोगही नोंद केलेला नाही. प्राप्त निविदांवर दिनांक नोंद केलेली नाही. प्रमाणकासोबत आवश्यक दस्तऐवज ठेवलेले नाहीत. इलेक्ट्रिक पाण्याचे पंप खरेदी करणे किंवा दुरुस्ती करणे, पंप दुरुस्तीसाठी साहित्य खरेदी करणे इत्यादी बाबी यांत्रिकी उप अभियंता यांच्याकडून प्रमाणित केलेल्या नाहीत.
गावातील मुलांना संगणक प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य देण्यासाठी अर्धवट अर्ज भरलेले आहेत. त्यावर मुलांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. ज्या संस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्या संस्थेचे शिक्षण घेत असल्याबाबत पत्र जोडलेले नाही. मुलांची प्रमाणित यादी नाही. स्तनदा माता, गरोदर माता, कुपोषित मुले, यांना पौष्टिक खाद्य वाटप केलेबाबत ग्रामपंचायत दप्तरी प्रमाणित यादी नाही. याचप्रमाणे किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप केलेले असून त्याबाबत त्यांची प्रामाणिक यादी नाही. ज्या अंगणवाड्यांना रंगरंगोटी केली, जाळी बसविली त्याबाबत त्या अंगणवाडीची पोच दप्तरी ठेवलेल्या नाहीत. वेळोवेळी स्ट्रीट लाईट साहित्य खरेदी केली आहे. त्याबाबत साठा रजिस्टरला नोंद करून विनियोग दर्शविलेला नाही. शाळांना व अंगणवाड्यांना पंधरावा वित्त आयोगांमधून जे जे साहित्य पुरवठा केले आहे. त्याची नमुना नंबर १६ ला नोंद करून योग्यरीत्या विनियोग दर्शविलेला नाही. ग्रामपंचायतकडील नमुना नंबर १६ मध्ये पंधरावा वित्त आयोगमधून खर्च करून साहित्याची नोंद एकत्रित नोंदविलेल्या आहेत; परंतु, कोणत्या वस्तू कोणाला अदा केलेल्या आहेत, ते समजून येत नाही. अशा प्रकारच्या अनियमितता, त्रुटी या अहवालात नमूद करण्यात आलेल्या आहेत. चौकशी दरम्यान ग्रामसेवक उमेश खोबरेकर यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केलेले नाही. त्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे, असे आढळून आल्याने त्यांचे विरुद्ध शिस्तभंग कारवाई म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित कालावधीत त्यांना वेंगुर्ले पंचायत समितीत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com