संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

Published on

पान ५ साठी, संक्षिप्त

रोटरीच्या अध्यक्षपदी बाळा आंबुर्ले
चिपळूण ः रोटरी क्लब चिपळूणच्या अध्यक्षपदी बाळा आंबुर्ले यांची नियुक्ती झाली आहे. सेक्रेटरीपदी शैलेश टाकळे तर राजेश ओतारी यांची खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे. अध्यक्षपदी नियुक्ती झालेले धनंजय आंबुर्ले हे बाळास इंटेरियरच्या माध्यमातून १९९५ पासून प्रसिद्ध इंटरियर डेकोरेटर म्हणून सुपरिचित आहेत. ते वैश्य पतसंस्थेचे सभासद आहेत. नवसाचा चिपळूणचा राजा मंडळाच्या स्थापनेपासून खजिनदार आहेत. बांदल हायस्कूलचे ते संचालक आहेत. रोट्रॅक्ट फनफेअर यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असतो. विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग आहे. सेक्रेटरी शैलेश टाकळे हे साउंड ऑफ म्युझिकच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात गेली २९ वर्ष कार्यरत आहेत. नवसाचा चिपळूणचा राजा मंडळाच्या स्थापनेपासून ते अध्यक्ष आहेत. मुरलीधर देवस्थानचे अध्यक्ष, चिपळूण इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. खजिनदारपदी राजेश ओतारी यांची नियुक्ती झाली आहे.

१६७०३
आदिती सूर्यवंशीचा सत्कार
राजापूर ः तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील आदिती सूर्यवंशी या विद्यार्थिनीने आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवताना खुला प्रवर्ग गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात द्वितीय तर राजापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिचा मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी शिक्षक रामदास सावंत, दीपक सूर्यवंशी, बी. के. गोंडाळ, लिपिक राजेंद्र मयेकर, वासुदेव भिवंदे, सूरेश गोसावी, विद्यार्थी उपस्थित होते.


१६७०५
सोहम सूद ठरला शिष्यवृत्तीधारक
लांजा ः लांजा तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शिरवली शाळेचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ निकाल १०० टक्के लागला असून, शाळेचा विद्यार्थी सोहम सूद याने रत्नागिरी जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शिष्यवृत्तीधारक ठरला आहे. त्याला वर्गशिक्षक संदीप घोरपडे, मुख्याध्यापक नंदकुमार गोतावडे, पदवीधर शिक्षिका श्रद्धा दळवी, पदवीधर शिक्षक उमेश केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

१६६३५
हर्णै ः सृष्टी चौधरीचा सन्मान करताना गटशिक्षणाधिकारी आण्णासाहेब बळवंतराव व इतर.

हर्णैच्या सृष्टीचा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून सत्कार
हर्णै ः पाचवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत दापोली तालुक्यातून हर्णै शाळेच्या सृष्टी चौधरीने प्रथम क्रमांक, राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ७ वा तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत तालुक्यातून पाचवीसाठी २८ व आठवीसाठी २० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी जिल्हा परिषद शाळेतील पाचवीचे २० विद्यार्थी तर आठवीचे ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. हा व्हिजन दापोलीचा इफेक्ट असून सर्वांनी त्यासाठी गेल्या वर्षभरात घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे, असे मत गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी व्यक्त केले. सृष्टीचा गटशिक्षणाधिकारी व सर्व शालेय शिक्षकांकडून विशेष सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.