ः वीजबिलातील सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन

ः वीजबिलातील सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन

Published on

३३ ( पान ५ साठी)

वीजबिलातील सवलतींचा लाभ घ्या

कैलास लवेकर ;तत्पर बिल भरा ; ऑनलाईन पेमेंट, गो ग्रीनही महत्वाचे

चिपळूण, ता. १८ ः महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट व गो ग्रीनच्या सुविधेमुळे वीजबिलात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी केले आहे.
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीजबिलातील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. वीजग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बील भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते. या खेरीज ग्राहकांनी छापिल कागदी बिलाऐवजी ई-मेलने बील स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरणपूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते. शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर केला तर दरमहा किमान २० रुपयांची म्हणजे वर्षाला २४० रुपयांची सूट मिळते. २०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने या तीनही उपायांचा अवलंब केला तर दरमहा ३५ रुपये म्हणजे वर्षाला ४२० रुपयांची सवलत मिळते.
महिना तीनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाला तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर करून दरमहा ५१ रुपयांची म्हणजेच वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळू शकते. विजेची बिले ऑनलाईन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे हे वीज ग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि बिलातही सवलत मिळते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.