विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या
गुणवंतांचा पाट विद्यालयामध्ये गौरव

विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या गुणवंतांचा पाट विद्यालयामध्ये गौरव

16910
पाट ः कला स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना मान्यवर.

विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या
गुणवंतांचा पाट विद्यालयामध्ये गौरव
कुडाळ ः एस. एल. देसाई विद्यालय, पाट येथे (कै.) एकनाथ ठाकूर कला अकादमीतर्फे विविध कलाविषयक उपक्रम राबविले जातात. अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील यशस्वी मुलांचा गौरव आज विद्यालयात करण्यात आला. यात जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेतील विजेता ऋवेद कांबळी याचा मुख्याध्यापक शामराव कोरे यांनी, नृत्य स्पर्धेतील विजेत्या युक्ती हळदणकर, निधी केळुसकर, दीक्षा सामंत यांचा सन्मान श्री. केरकर, श्री. बोंदर यांनी केला. चित्रकला परीक्षेमध्ये ‘अ’ श्रेणी प्राप्त विद्यार्थी प्रज्योत मेस्त्री, भार्गवी पाटकर, सोहनी साळस्कर, योगिता मांजरेकर, संतोषी बिलीये, राज पाटकर, ऋग्वेद कांबळे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर उपस्थित होते. सर्व संस्था कार्यकारिणी सदस्यांनी यशस्वी मुलांचे कौतुक केले. जास्तीत जास्त मुलांनी कलाविषयक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
..............
16911
कुडाळ ः डॉ. प्रियांका घुर्ये यांचे स्वागत करताना मुख्याध्यापिका मुमताज शेख आदी.

किशोरवयीन मुलींना कुडाळात मार्गदर्शन
कुडाळ ः आई ही तुमची सर्वांत जवळची मैत्रीण असून, तिच्याशी मोकळेपणाने संवाद साधा, असे प्रतिपादन डॉ. प्रियांका घुर्ये यांनी केले. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत किशोरवयीन मुलींसाठी आयोजित ‘उत्कर्षा’ शिबिरांतर्गत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. घुर्ये यांनी किशोरवयीन मुलींनी करावयाचे योगाभ्यास, त्यांचा आहार, या वयात कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याविषयी मार्गदर्शन केले. मुलींशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. या वयामध्ये तणावमुक्त जीवन जगण्याचा कानमंत्र त्यांनी मुलींना दिला. या शिबिरास सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींसह मुख्याध्यापिका मुमताज शेख, शिक्षक व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
---
कणकवली येथे योगासन स्पर्धा
कणकवली ः नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या मान्यतेने २२ ते २३ जुलै या कालावधीत येथील कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात सकाळी ९ वाजता जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा टॅडिशनल योगासन, आर्टिस्टिक योगासन सिंगल, आर्टिस्टिक योगासन पेअर आणि रिदमिक योगासन पेअर अशा चार प्रकारांत होणार आहे. यासाठी स्पेशल तीन मिनिटांचा तालबद्ध असलेला ऑडिओ पेनड्राईव्हमध्ये असावा. स्पर्धा मुले व मुलींसाठी स्वतंत्र गटात होणार आहे. स्पर्धकांनी १९ जुलैपर्यंत महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् या वेबसाईटवरील गुगल फॉर्म लिंकवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी डॉ. तुळशीराम रावराणे, डॉ. वसुधा मोरे, संजय भोसले, श्री. बांदेकर किंवा श्री. कोचरे यांच्याशी संपर्क साधावा.
----------------
शिष्यवृत्ती परीक्षेत वजराट शाळेचे यश
वेंगुर्ले ः वजराट शाळा क्रमांक १ च्या सात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश पटकावित शिष्यवृत्ती प्राप्त केली. यात राष्ट्रीय ग्रामीणमध्ये जिल्ह्यात दुसरा व तिसऱ्या क्रमांकावर दोघांची, तर पाचजण राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक ठरले. यात कर्तव्य बांदिवडेकर (राष्ट्रीय ग्रामीण जिल्ह्यात तिसरा), वेदिका वजराटकर (राज्यस्तरीय ग्रामीण, जिल्ह्यात दुसरी), साबाजी उर्फ कार्तिक पडवेकर (राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक), पूर्वा परब (राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक), अश्विन सोन्सूरकर (राज्यस्तरीय ग्रामीण, शिष्यवृत्तीधारक), हर्षल मेस्त्री (राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक), स्नेहा परब (राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृतीधारक) यांचा समावेश आहे. या मुलांचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, सरपंच अनन्या पुराणिक, उपसरपंच केरकर आदींनी अभिनंदन केले.
--
16913
दीपक गोसावी

दीपक गोसावींना ‘प्रेरणा गौरव’ पुरस्कार
ओरोस ः (कै.) बळवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेडकीहाळ यांच्यावतीने तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नुकतेच बेडकीहाळ येथे झाले. या संमेलतात राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या ११ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्या सर्व शिक्षकांना राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर-बौद्धवाडी (ता. मालवण) जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक दीपक गोसावी यांनाही गौरविण्यात आले. त्यांचा पदक, कोल्हापुरी फेटा, मानपात्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याबदल गोसावी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com