वेंगुर्ले शिक्षक समितीचा गरजूंना हात

वेंगुर्ले शिक्षक समितीचा गरजूंना हात

टीपः swt१८५.jpg मध्ये फोटो आहे.
वेंगुर्ले ः प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने शिक्षक दत्तक पालक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.


वेंगुर्ले शिक्षक समितीचा गरजूंना हात

४२ विद्यार्थी दत्तक; वर्धापनदिनी शालेय साहित्य वाटप

वेंगुर्ले, ता. १८ ः महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्लेमार्फत शिक्षक समितीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दत्तक पालक उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी उत्साहात झाला. यावेळी तालुक्यातील १४ केंद्रांमधून प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण ४२ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. शिक्षक समितीच्या शिलेदारांनी या उपक्रमासाठी स्वयंस्फूर्तीने निधी जमा केला. या निधीमधून समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्‍घाटन शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे, कोकण विभाग सरचिटणीस संतोष परब, जिल्हा सचिव सचिन मदने, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण, सुरेखा कदम, पंचायत समिती माजी सभापती जयप्रकाश चमणकर, समितीचे तालुकाध्यक्ष सीताराम लांबर, सचिव प्रसाद जाधव, प्रवक्ते भाऊ आजगावकर आदी उपस्थित होते.
मागील वर्षीपासून सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम प्रत्येक शिक्षक समितीचा प्रत्येक शिलेदार करत आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून दत्तक पालक या स्तुत्य उपक्रमाबद्दल समितीचे कौतुक केले. शिक्षक समितीसाठी आपली संपूर्ण कारकीर्द ज्यांनी समर्पित केली, अशा निवृत्त ज्येष्ठ शिक्षक बंधू-भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला. बदलीमुळे तालुक्यात सेवा बजावून दुसऱ्या तालुक्यात गेलेले आणि तालुक्यात आलेल्या शिक्षकांसह कोकण विभाग सरचिटणीसपदी नवनियुक्त झालेले संतोष परब, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी निवड झालेले शंकर उर्फ राजू वजराटकर, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी वेंगुर्ले संचालकपदी निवड झालेले सीताराम लांबर, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनोद मेतर यांचा सत्कार करण्यात आला.
..................
चौकट
सीताराम नाईक नूतन तालुकाध्यक्ष
सोहळ्याचे औचित्य साधून समितीचे नूतन तालुकाध्यक्ष म्हणून सीताराम नाईक, उपाध्यक्ष कर्पूरगौर जाधव, सहसचिव रवींद्रनाथ गोसावी, तालुका संपर्क प्रमुख रामचंद्र झोरे यांची नावे जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊ आजगावकर यांनी केले. सीताराम नाईक आणि ऋतिका राऊळ यांनी सूत्रसंचालन केले. कर्पूरगौर जाधव यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com