ःलायन्स क्लब ऑफ सावर्डेचा पदग्रहण सोहळा उत्साहात

ःलायन्स क्लब ऑफ सावर्डेचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Published on

२९ (टुडे पान ३ साठी)

लायन्स क्लब ऑफ सावर्डेचा पदग्रहण सोहळा
चिपळूण, ता. १८ ः लायन्स क्लब ऑफ सावर्डे नवीन कार्यकारिणीचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा नुकताच सावर्डे येथील सेमिनार हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला सुनील सुतार, विजय जमदग्नी, रिजन चेअरमन डॉ. विजय रिळकर, झोन चेअरमन विजयकुमार रतवा, सावर्डे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश चव्हाण तसेच चिपळूण लायन्स क्लब, गुहागर लायन्स क्लब, गॅलॅक्सी क्लब चिपळूणचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि मेलिन जोन्स यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. अध्यक्ष राजेश कोकाटे यांनी आपल्या वर्षभरातील केलेल्या कामांचा आढावा दिला तसेच सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले. सुतार यांनी नूतन अध्यक्ष डॉ. नीलेश पाटील, सचिव सतीश सावर्डेकर, खजिनदार अरविंद भंडारी आणि इतर सदस्य यांना शपथ दिली. नवीन सदस्य डॉ. अजित गावकर हे लायन्स क्लबमध्ये समाविष्ट झाले. लायन्स क्लबच्या लेपल पिनचे आणि पावसाळ्यात घ्यावयाची काळजी या पत्रकाचे अनावरण करण्यात आले. डॉ. पाटील यांनी लायन्स क्लब सावर्डे गेली ५ वर्ष सावर्डे परिसरात विविध माध्यमातून सामाजिक काम करत आहे. अजूनही शैक्षणिक आणि आरोग्यविषयक काम करायचे असून आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.