खोरनिनको धबधबा वाहतोय पूर्ण क्षमतेने

खोरनिनको धबधबा वाहतोय पूर्ण क्षमतेने

Published on

३४ (टुडे पान ३ साठी, मेन)


-rat१७p४९.jpg ः
23M16936
लांजा ः खोरनिनको येथील मानवनिर्मित धबधबा.
--------------

खोरनिनको धबधबा वाहतोय पूर्ण क्षमतेने

विलोभनीय दृश्य ; पर्यटकाना सेवा सुविधांची वानवा

लांजा, ता. १८ ः पावसाळी पर्यटनाच्यादृष्टीने हक्काचे ठिकाण असलेल्या लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण आणि मानवनिर्मित धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. निसर्गाचे हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी सध्या या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.
लांजा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत खोरनिनको गावातील खोरनिनको धरण आणि येथील मानवनिर्मित धबधबा हा गेल्या काही वर्षात पर्यटकांसाठी व पर्यटनाचे हक्काचे ठिकाण बनले आहे. भुशी डॅम अशी ओळख बनलेल्या खोरनिनको धरणाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. सह्याद्रीच्या उंच उंच रांगांचे मनमोहक दृश्य डोळ्यात साठवत या धरणाचा नितांत सुंदर असा मनमोहक किनारादेखील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यातील पाण्याचे टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात आले आहे.
खोरनिनको येथे मुचकुंदी नदीवर बांधण्यात आलेले नयनरम्य धरण आणि येथील मानवनिर्मित धबधबा हा पर्यटकांना भुरळ पाडणारा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. गेल्या चार ते पाच वर्षांत या खोरनिनको धरण आणि धबधबा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे; मात्र पर्यटनाच्यादृष्टीने आजही या ठिकाणी म्हणाव्या तशा सेवासुविधा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतो. नाही म्हणायला या ठिकाणी वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था येथील राजाराम सावंत यांनी उपलब्ध करून दिली आहे; मात्र अन्य सेवा सुविधांची या ठिकाणी मात्र वानवाच आहे. त्यामुळे शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या तर या ठिकाणचे सौंदर्य अधिक वाढेल आणि जास्तीत जास्त पर्यटक येतील. त्यामुळे हे ठिकाण आणखी प्रसिद्ध होईल, असे मत पर्यटकांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.