तांबडीवाडीचे मुंबईकर वृक्षारोपणासाठी गावी

तांबडीवाडीचे मुंबईकर वृक्षारोपणासाठी गावी

१७ (टुडे पान २ साठी)

-rat१८p१७.jpg ः
२३M१६८९६
मंडणगड ः एकेक झाड लावूया वसुंधरेला सजवूया, असा नारा देत या अभिनव उपक्रमात सहभागी झालेले मुंबईकर.
----------

तांबडीवाडीचे मुंबईकर वृक्षारोपणासाठी गावी

उत्साही नवतरुण कलामंडळ ; फळ, औषधी झाडांची लागवड

मंडणगड, ता. १८ ः मंडणगड तालुक्यातील उत्साही नवतरुण कलामंडळ तांबडीवाडी गावचे मुंबईकर यांनी गावाशी नाळ कायम ठेवण्याच्यादृष्टीने गावी येत वृक्ष लागवड उपक्रम घेतला. गावाच्या परिसरात विविध प्रकारची फळ व औषधी झाडे लावून एक दिवस निसर्गासाठी देत आपली बांधिलकी जपली. यामुळे गावाचा परिसर सुजलाम् सुफलाम् राहण्यास मदत होणार आहे.
या वृक्षारोपण अभियानाची सुरवात मुंबई ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष सूर्यकांत काप यांच्या हस्ते करण्यात आली. हे नवतरुणांचे असणारे मंडळ दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत असतात. तसेच यावर्षी २५ रौप्य वर्षानिमित्ताने वृक्षारोपण अभियान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये वड, पिंपळ, बेल, आवळा, नारळ, कडुलिंब, गुलमोहर तर काही सुगंध फुलांची लागवड करण्यात आली. विशेष या उपक्रमासाठी मंडळातील सदस्यांनी मुंबईमध्ये आपल्या राहत्या ठिकाणी खिडकीत कुंड्यामध्ये वर्षभर वाढवलेली झाडे या कार्यक्रमासाठी गावी आणण्यात आली. त्यांच्या मंडळाचा एकच उद्देश आहे, निसर्ग मानवाला खूप काही देत असतो. याची जाण ठेवून प्रत्येक तरुणांमध्ये समाजकल्याणाची आणि निसर्गाशी जोडण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. एकेक झाड लावूया वसुंधरेला सजवूया, असा नारा देत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमासाठी नवतरुण मंडळ, सर्व सदस्य, पदाधिकारी आपापल्या स्वखर्चाने गावी आले तसेच सकाळी चहा, नाश्ता, दुपारचा जेवण हे सार्वजनिक मंडळाच्यावतीने व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाला गावी जाण्यासाठी श्री गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स कमी दरात गाडीची व्यवस्था केली. या कार्यक्रमासाठी मुंबई ग्रामस्थ मंडळाचे कार्याध्यक्ष शिवाजी भानत, उपाध्यक्ष सूर्यकांत काप, खजिनदार हितेश रेशीम, उपसचिव विजय बोर्ले, जितेंद्र बोर्ले आणि मंडळाचे आधारस्तंभ अनंत बोर्ले तसेच अतिथी म्हणून गणेश काप उपस्थित होते.
मागील वर्षी पावसाळ्यात अंगमेहनत करून गावाला २४ तास पाण्याची व्यवस्था सहा महिने पुरेल, असे सामाजिक हिताचे यशस्वी काम करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com