धरू कास उद्योजकतेची

धरू कास उद्योजकतेची

२३ (टुडे पान ३ साठी, सदर)

१२ जुलै टुडे तीन
धरू कास उद्योजकतेची............लोगो


-rat१८p८.jpg ः
२३M१६९०३
प्रसाद जोग
-----------

एमएसएमई उद्यमवाढीमध्ये एमसीईडीचे योगदान मोठे

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग अर्थात् MSME

सूक्ष्म, लघु, मध्यम स्वरूपाचे उद्योग अर्थकारणात महत्वाची भूमिका बजावत असतात. भारतात MSME म्हणजे (Micro) सूक्ष्म, (Small) लघु, (Medium) मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी व या उद्योगांची गरजेनुरूप नवी परिभाषा निर्धारित करून त्यांच्या वाढीसाठी व अर्थव्यवस्था आणखीन बळकट करण्यासाठी या संदर्भात विविध योजना राबवल्या जाव्यात व धोरण निश्चित केले जावे म्हणून भारत सरकारने सूक्ष्म, लघु, मध्यम उद्यम मंत्रालय स्थापित केले असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत होते.
ग्रामीण आणि अविकसित भागात फक्त मोठे उद्योग येऊन सर्वंकष विकास होऊ शकत नाही हे जाणून एमएसएमई प्रादेशिक असमतोल कमी करण्याच्या हेतूने स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होण्याची गरज ओळखून कमी भांडवली खर्चात उभ्या राहू शकणाऱ्या लघु, ग्रामीण उद्योगांना उद्योग उभारणीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे काम करते. सामाजिक व आर्थिक विकासात MSME युनिट महत्वाची भूमिका निभावतात. देशाच्या GDP म्हणजेच Gross Domestic Product मध्ये MSME चा सिंहाचा वाटा असतो आणि याच जीडीपीच्या आकडेवारीनुसार देशाच्या विकासाची गती कळत असते.
खादी आणि ग्रामोद्योग हे कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे उद्योग MSME चे महत्वाचे अंग म्हणता येऊ शकते. यातून ग्रामीण भागातील कलाकारांना व कारागिरांना शाश्वत रोजगार मिळतो. आत्मनिर्भर भारत बनण्याच्यादृष्टीने असे छोटे विकेंद्रित उद्यम महत्वाचे व उपयुक्त सिद्ध होत असतात. नवीन उद्योजक वाढावेत म्हणून KVIC व COIR बोर्ड हे MSME युनिट वाढीसाठी राज्य सरकार व अन्य संस्थांबरोबर एकत्रितरित्या काम करण्यास अनुकूल असतात. MSMEच्या प्रचार आणि प्रसाराची तसेच विकासाची प्राथमिक जबाबदारी ही राज्य सरकारची असते. केंद्र सरकारचे MSME मंत्रालय उद्योजकांच्या सर्वंकष विकासासाठी कटिबद्ध असते. कोकणचे सुपुत्र व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाचे मंत्री असून भानूप्रताप सिंह वर्मा हे राज्यमंत्री आहेत. भारतीय अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी व जागतिक पातळीवर स्पर्धाक्षम सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी MSME महत्वाचे व्हिजन घेऊन काम करते. पर्यावरणस्नेही उद्योग, कृषिआधारित प्रक्रिया उद्योग KVIC व COIR च्या माध्यमातून वाढून उद्योजकता विकासाला चालना मिळवून उद्योजकतेची व्याप्ती वाढून देशांतर्गत रोजगार निर्मिती करणे हे MSME चे मुख्य मिशन आहे. उद्योगमंत्री उदय सामंत उद्योगखात्यातर्फे उद्योजकता विकासास प्राधान्य देत असून, नवीन MSME युनिट वाढावेत म्हणून प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रात MCED ही नामांकित संस्था उद्योजकता विकासाचे महत्वाचे कार्य करत आली आहे. उद्योग वाढून पहिल्या पिढीचे यशस्वी उद्योजक या माध्यमातून घडले गेले आहेत. महाराष्ट्र राज्यात उद्योजकता विकासक्षेत्रात काम करणारी ही अग्रणी संस्था आहे. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाअंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था असून, १ ऑक्टोबर १९८८ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेचा हेतू हा शास्त्रोक्त प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योजक घडवणे, उद्योजकता विकास करणे, उद्योजकीय संस्कृती रूजवणे व संवर्धन करणे तसेच कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मनुष्यबळ विकास करणे व उद्योजकतेविषयी माहितीचे संकलन करणे आणि या क्षेत्रात संशोधन करणे हा आहे. या हेतू पूर्ततेसाठी संस्था राज्यात राज्यव्यापी जिल्हानिहाय व तालुकानिहाय विविध उपक्रम राबवते. संस्थेचे मुख्यालय (औरंगाबाद) छत्रपती संभाजीनगर येथे असून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उद्योगकेंद्राच्या आवारात यांचे कार्यालय आहे. उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांना माहिती, मार्गदर्शन, प्रेरणा देण्याच्यादृष्टीने संस्था उद्योजक मासिक प्रकाशित करते. या मासिकाचा दरवर्षी दीपावली विशेषांकही प्रकाशित होत असतो.
जागतिक पातळीवर उद्योजकीय चैतन्यनिर्मिती करणे हे संस्थेचे प्रमुख मिशन आहे. तर संस्थेचे व्हिजन हे की, ग्राहकांचे समाधान केंद्रस्थानी ठेवून संघटना व व्यक्ती यांच्या उद्योजकीय व व्यवस्थापकीय क्षमतेत वृद्धी होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे नैतिक मुल्यांची जोपासना करत साहाय्यभूत ठरणे. कर्मचाऱ्यांचे हित व आकांक्षा जोपासत संस्था आत्मनिर्भर व विश्वात उत्कृष्ट संस्था म्हणून संबोधली जावी यासाठी कटिबद्ध असणे.
उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम, प्रेरक प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, संस्था विकास प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, व्यवस्थापन विकास प्रशिक्षण कार्यक्रम ,मनुष्यबळ विकास प्रशिक्षण कार्यक्रम, उद्योजकता परिचय कार्यक्रम, समूह विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवते व उद्योजकीय मानसिकता तरुण पिढीमध्ये निर्माण करण्याचे महत्वाचे काम पार पाडते. रत्नागिरी जिल्ह्यात रमेश जाधव हे जिल्हा प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहतात तसेच
पल्लवी मोरे या रत्नागिरी कार्यालयात कार्यालयीन काम पाहतात. MCEDच्या प्रशिक्षणातून उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींना कोणता उद्योग निवडावा, कसा निवडावा, त्याचं व्यवस्थापन कसं करावं, तंत्रज्ञान कोणते वापरावेत ही सर्व विस्तृत माहिती तसेच शासनाची सबसिडी, अर्थसाहाय्य योजना या विषयी सर्वंकष मार्गदर्शन केले जाते. हजारो प्रशिक्षणार्थी राज्यात या प्रशिक्षणांचा लाभ घेऊन उद्योजक बनत आहेत. आपल्या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन उद्योजक बनून जिल्ह्याच्या GDPत मोठी भर घालावी.

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com