पेन्शन प्रस्ताव मंजुरीसाठी
मोरजकर ट्रस्टचा पुढाकार

पेन्शन प्रस्ताव मंजुरीसाठी मोरजकर ट्रस्टचा पुढाकार

Published on

16933
नांदगाव ः यावेळी‌‌ किशोर मोरजकर ट्रस्टचे पदाधिकारी.

पेन्शन प्रस्ताव मंजुरीसाठी
मोरजकर ट्रस्टचा पुढाकार
नांदगाव, ता. ११ ः किशोर मोरजकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून येथील आवश्यक कुटुंबांना पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा अभिनव उपक्रम जाहीर केला आहे.
(कै.) किशोर मोरजकर हे भजनी बुवा होते. त्यांनी २००९ मध्ये शासनाच्या कलाकार मानधनासाठी प्रस्ताव केला होता; मात्र तो प्रस्ताव प्रलंबितच राहिला आणि त्यांच्या निधनानंतर पेन्शन मंजूर करण्यात आल्याबाबत पत्र आले. असा प्रकार इतर कोणाच्या बाबतीत होऊ नये, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. कुठल्याही निराधार पेन्शन, कलाकाराला मानधन मिळण्यासाठी शासकीय कार्यालयांत हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रस्ताव तयार करून सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह तो मंजूर होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष भाई मोरये, सचिव निकेत पावसकर, मारुती मोरये, दीपक मोरजकर, तोसीम नावलेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.