-भाज्या महागल्या, कोकणात रानभाज्यांचा पर्याय

-भाज्या महागल्या, कोकणात रानभाज्यांचा पर्याय

Published on

१९ (टुडे पान २ साठी)

भाज्या महागल्या, रानभाज्यांचा पर्याय

पौष्टिक आणि स्वस्त ; ग्रामीण भागातील महिलांना उत्पन्नाचे साधन

संगमेश्वर, ता. १८ ः भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. काही ठिकाणी पाऊस नाही तर काही ठिकाणी अती पाऊस! याचा फटका शेतकरीवर्गाला बसत आहे. शेतमालाचे नुकसान झाले आणि त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले. टोमॅटोने तर शंभरी केव्हाच गाठली आहे. बाजारातील भाज्यांचे दर आवाक्याबाहेर गेल्याने कोकणच्या ग्रामीण भागातील महिलांनी यावर आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या रानभाज्यांचा स्वस्त आणि मस्त पर्याय शोधून काढला आहे.
कोकणात पावसाळ्यात रानभाज्या मुबलक मिळतात. त्याही रानामध्ये माहितगारच शोधून आणू शकतात. संगमेश्वरच्या बाजारात ग्रामीण भागातील महिला फोडशी, भारंगी, टाकळा, अळू अशा विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. या सर्व प्रकारच्या रानभाज्या पावसात एकदा तरी घ्याव्यात, असे घरातील अनुभवी माणसे सांगत असतात. या रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने यामुळे पोट साफ होण्यास मदत होते याबरोबरच या भाज्या आरोग्यदायी समजल्या जातात.
सध्या टोमॅटो शंभरीपार तर अन्य भाज्या ८० रुपये किलोच्या पुढे पोहचल्या असल्याने कोकणच्या ग्रामीण भागात फोडशी, भारंगी, कुड्याच्या शेंगा, टाकळा, अळंबी, आंबाडी आणि अळू या आरोग्यदायी भाज्यांवर अधिक भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. यातील काही भाज्या ग्रामीण भागातील महिला विक्रीसाठी घरोघरी नेतात. यातील काही भाज्या कडवट असल्याने त्या चांगल्या पिळून त्यांचा कडवटपणा काढून शिजवल्या जातात. आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असणाऱ्या या रानभाज्या सध्या बाजारातील अन्य भाज्यांना पर्याय म्हणून पुढे येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.