-रत्नागिरीतील दोन नाट्यकर्मींचा पुण्यात गौरव

-रत्नागिरीतील दोन नाट्यकर्मींचा पुण्यात गौरव

५ (टुडे पान २ साठीमेन)


-rat१८p२१.jpg-
२३M१६९३०
निलकंठ गोखले
-rat१८p२३.jpg-
२३M१६९३२
अमेय धोपटकर
------
रत्नागिरीतील दोन नाट्यकर्मींचा गौरव

बालगंधर्व संगीत मंडळ ; धोपटकरांना किर्लोस्कर आणि गोखलेंना बखले पुरस्कार

रत्नागिरी, ता. १८ः पुण्यातील बालगंधर्व-संगीत रसिक मंडळाचा यावर्षीचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार येथील रंगकर्मी, तंत्रज्ञ आणि नाटककार अमेय धोपटकर यांना तर दापोलीच्या निळकंठ गोखले यांना भास्करबुवा बखले पुरस्कार प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे गोव्याचे सांस्कृतिक मंत्री डॉ. गोविंद गावडे व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेली ४७ वर्षे ही संस्था संगीत रंगभूमीसाठी कार्यरत आहे. संगीत नाटकांना पुन्हा उज्वल काळ प्राप्त झाला पाहिजे. या उद्देशाने मंडळ विविध उपक्रम राबविते. दरवर्षीच्या बालगंधर्व स्मृतिदिनी विविध क्षेत्रातील कलावंताना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
रत्नागिरीतील लेखक अमेय धोपटकर यांचे नाट्यक्षेत्रात योगदान आहे. संगीत कुरुमणी, संगीत मल्लिका या संगीत नाटकांचे लिखाण अमेय यांनी केले आहे. ते स्वतः कवी-लेखक, दिग्दर्शक, अभिनेते तसेच तंत्रज्ञ अशा क्षेत्रात पारंगत आहेत. यावर्षी संगीत मल्लिका या नाटकाला नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला होता. बालगंधर्व-संगीत रसिक मंडळाने त्यांच्या कार्याचा व नाट्य लेखनाचा विचार करुन त्यांना अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्काराने गौरवले.
शासनाच्या संगीत नाट्य स्पर्धेत गोपिका रमणू स्वामी माझा या नाटकासाठी आणि ६१ व्या स्पर्धेत तमसो मा ज्योतिर्गमय या नाटकासाठी संगीत दिग्दर्शानाचे द्वितीय पारितोषिक प्राप्त झालेले गिम्हवणे येथील गायक, संवादिनी, गीतकार, कीर्तनकार, संगीत व कीर्तन विशारद निलकंठ गोखले यांच्या आजवरच्या संगीत क्षेत्रातील प्रवासाचा विचार करून त्यांना भास्करबुवा बखले या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
------
कोट...
देव गंधर्व भास्कर बुवा बखले यांच्या नावाने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर माझी जबाबदारी वाढली आहे. बुवांचे उत्तुंग सांगितिक कार्य पाहता मी केलेल्या उण्यापुऱ्या ३५० च्या वर संगीत रचना व त्यातील पाच नाटकासांठी १०० एक नाट्य पदरचना या निमित्ताने संगीत रंगभूमीची अल्पशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. पुरस्कारामुळे नवीन काम करण्याची प्रेरणा व उत्साह वाढतो. आजवरच्या वाटचालीत अनेक कलाकारांचे सहकार्य लाभले आहे.
-निळकंठ गोखले, संगीत व कीर्तन विशारद, दापोली
--------
कोट...

संगीत कुरुमणी, संगीत मल्लिका अशी संगीत नाटकांचे लिखाण केल्यानंतर संगीत क्षेत्रातील मेख मिळाली, वाचनाबरोबरच, बुजूर्ग लेखक, नाटककार मंडळी यांच्या समवेत वावरताना लिखाणाचा अनुभवही मिळाला. कविता-लेखन, दिग्दर्शक, अभिनेते तसेच तंत्रज्ञ अशा क्षेत्रात सदोदित असल्यामुळे नाट्य स्पर्धेसाठी नाटकाचे लिखाण करण्याची सवय लागली. या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे.
-अमेय धोपटकर, नाटककार-लेखक, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com