रत्नागिरी- महिला बचत गटांनी मांडली यशोगाथा आणि समस्याही

रत्नागिरी- महिला बचत गटांनी मांडली यशोगाथा आणि समस्याही

फोटो ओळी
-rat१८p९.jpg-३M१६९०४ रत्नागिरी ः शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या कडवाडकर संकुलात आयोजित डब्ल्यू- २० परिषदेमध्ये महिला बचत गटांच्या समन्वयिका चर्चासत्रात व्यक्त झाल्या.
-----------

लोगो..... डब्ल्यू-२० परिषद

महिला बचत गटांच्या वस्तूंची मॉलमध्येही विक्री व्हावी

महर्षी कर्वे संस्था ; अहवाल जाणार जी-२० कडे

रत्नागिरी, ता. १८ ः महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत महिला बचतगटांचे प्रभाग संघ कार्यरत आहेत; परंतु प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री घेणे परवडणारे नाही. आम्ही उत्पादित केलेल्या वस्तू मोठ्या मॉलमध्ये विक्री करण्याची संधी मिळायला हवी तसेच प्रशिक्षणासाठी ठेवलेली वयाची अट गैरसोयीची ठरते. कुटुंब सांभाळून प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यात अडचणी येतात. अशा समस्या महिलांनी मांडल्या. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित डब्ल्यू-२० परिषदेत चर्चासत्रातून या समस्या पुढे आल्या. या समस्यांचा अहवाल बनवून तो जी-२० परिषदेकडे देण्यात येणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील या प्रभाग संघांचे १० क्लस्टर्स केले असून यात सुमारे हजार बचत गट कार्यरत आहेत. या गटांची यशोगाथा आणि येणाऱ्या काही समस्या डब्ल्यू- २० परिषदेत मांडण्यात आल्या. कर्वे संस्थेच्या बीसीए कॉलेजला ही परिषद भरवण्याची संधी मिळाली. तळागाळातल्या महिलांचे नेतृत्व हा डब्ल्यू-२० परिषदेचा प्रमुख हेतू होता. केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ बचत गटापर्यंत पोहोचत असल्याचेही महिलांनी सांगितले.
जी-२० अंतर्गत रत्नागिरीत प्रथमच डब्ल्यू-२० परिषद भरवण्यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजला मान मिळाला. एकदिवशीय परिषदेत महिलांचे चर्चासत्र झाले. या परिषदेचे उद्घाटन एनएसडीटी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन प्रभुतेंडुलकर यांनी केले. चर्चासत्रामध्ये तालुक्यातील विविध प्रभाग संघांच्या दीक्षा निवळकर, (जीवनज्योती, वाटद), स्वरा देसाई (एकता, कोतवडे), नेहा केळकर (धनज्योती, नाचणे), पूनम करंजवकर (क्रांती, शिरगाव), पूजा पांचाळ, राजश्री पानवलकर (हिरकणी, करबुडे), समीक्षा वालम (रत्नकन्या, हरचिरी), प्राची सावंत (कोकणरत्न, मिरजोळे), किमया सुर्वे (उद्योगरत्न, गोळप), विद्या बोंबले, सुमंगला पालकर (उन्नती, हातखंबा) यांनी सहजपणे आपल्या बचतगटांविषयी आणि समस्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. ज्योती मुळ्ये यांनी या परिषदेचे संचालन केले. त्यानंतर संस्था सदस्य अॅड. संध्या सुखटणकर यांनी महिलांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. सर्व महिलांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.

चौकट १

पापड, लोणची ते प्रक्रियायुक्त पदार्थ
महिला बचतगट म्हणजे पापड, लोणची आणि खाद्यपदार्थ करणाऱ्या महिलांचे संघ असा काहीसा समज असतो. त्याला छेद देणारे कार्य महिला करत असल्याचे या परिषदेत स्पष्ट झाले. कोकणातील दुर्लक्षित राहिलेल्या फणसावर प्रक्रिया, भरड धान्य वर्षात महत्व मिळत असलेल्या नाचणीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ, भाजीपाला, नर्सरी, मसाले तयार करणाऱ्या महिलांनी आपल्या यशोगाथा सांगितल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com