चिपळूण - वंदे भारत मुळे पाच गाड्या साईट ट्रॅक वर

चिपळूण - वंदे भारत मुळे पाच गाड्या साईट ट्रॅक वर

वंदे भारतमुळे पाच गाड्या साईट ट्रॅकवर

एक्स्प्रेस गाड्यांना फटका ; प्रवाशांची गैरसोय

चिपळूण, ता. १८ ः कोकण रेल्वेमार्गावर मोठा गाजावाजा करत वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. सुपरफास्ट रेल्वे म्हणून तिला सुरवातीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेमुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या महत्वाच्या ५ गाड्या सायडिंगला पडल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांना उशीर होत आहे.
मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्स्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करून द्यावा लागत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसला आहे. वंदे भारतला बाजू देण्यासाठी या गाड्या सायडिंगला टाकल्या जात आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून पहाटे ५.२५ वा. सुटते. मान्सून वेळापत्रकाप्रमाणे दुपारी तीनच्या सुमारास मडगावला पोहोचते. त्यामुळे या कालावधीत कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या नागपूर-मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस या गाड्या थांबवून ठेवण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव तेजस एक्स्प्रेस या गाडीलाही नेहमीच लेटमार्क लागत आहे. तसेच दुपारी मडगावहून मुंबईसाठी सुटणारी तेजस एक्स्प्रेसही सायडिंगला पडत आहे.


कोट
कोकण रेल्वेमार्गावर सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी रेल्वे आवश्यक आहे. वंदे भारतमुळे इतर रेल्वेगाड्यांना उशीर होत असेल तर या रेल्वेच्या तिकीटदरात सवलत द्यावी.
- शौकत मुकादम, कोकण रेल्वे अन्याय निवारण समीती

कोट
कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करताना एकतर तिकीट मिळत नाही. मिळाले तर ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहचता येत नाही. प्रत्येकवेळी वंदे भारतचे कारण दिले जाते. सामान्य लोकांचाही रेल्वे महामंडळाने विचार करायला हवा.
- गणेश पिंपळे, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com