मंत्री केसरकरांचा वाढदिवस उपक्रमांनी

मंत्री केसरकरांचा वाढदिवस उपक्रमांनी

Published on

16971
सावंतवाडी ः मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
16972
सावंतवाडी ः दिव्यांगावर मात करून राज्यात दुसरा आलेला कुणाल सूर्यवंशी याला वॉकर देताना मान्यवर.
16973
सावंतवाडी ः शहरातील आठवडा बाजारातील भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
16974
सावंतवाडी ः शहरातील अंकुर निवारा केंद्र येथील महिलांसाठी इलेक्ट्रीक गिझर भेट देण्यात आला.


मंत्री केसरकरांचा वाढदिवस उपक्रमांनी

उत्साहाचे वातावरण; उज्वल वाटचालीसाठी सावंतवाडीकरांकडून शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ६८ वा वाढदिवसानिमित्त आज शिवसेना पदाधिकारी व दीपकभाई मित्रमंडळातर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री. केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात तसेच आजूबाजूच्या गावात आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला आपत्कालीन व्यवस्थापन टीमसाठी मदत निधी देण्यात आला. हा निधी सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर व रवी जाधव यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. दिव्यांगावर मात करून राज्यात दुसरा आलेल्या कुणाल सूर्यवंशी याला वॉकर भेट स्वरुपात देत त्याच्या जिद्दीला सलाम केला. दिव्यांग मुलांना स्वावलंबी बनण्यात मदत व्हावी, या उद्देशाने राज्य पाठ्यपुस्तकात तयार केलेले नवे विषय घेऊन दहावीच्या परीक्षेत कुणाल हा चांगल्या गुणांनी उतीर्ण झालेला हा विद्यार्थी आहे. दुसरीकडे पुरूषोत्तम मेस्त्री यांना वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत तर सावंतवाडी शहरातील अंकुर निवारा केंद्र येथील महिलांसाठी इलेक्ट्रीक गिझर भेट देण्यात आला. याशिवाय शहरातील आठवडा बाजारातील भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी ज्येष्ठ नगरसेविका अनाराजीन लोबो, तालुकाप्रमुख बबन राणे, महिला शहराध्यक्ष भारती मोरे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, सुरेंद्र बांदेकर, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुजित कोरगावकर, गजानन नाटेकर, विश्वास घाग, अब्जू सावंत, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, दत्ता सावंत, परशुराम चलवाडी, नीलिमा चलवाडी, प्रतिक बांदेकर, विशाल बांदेकर आदी उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनानिमित्त मंत्री केसरकर हे मतदारसंघात नसल्याने त्यांना प्रत्यक्ष शुभेच्छा देता आल्या नाहीत. त्यामुळे अनेकांनी त्यांना मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या.
----------
चौकट
गावा-गावांतही उपक्रम
गावा गावातही वैयक्तिक मदत तसेच तालुका पातळीवर महाआरोग्य शिबिरही घेण्यात आले. याव्यतिरिक्त क्रीडा, मॅरेथॉन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. एकूणच केसरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्यात आला. दिवसभर सामाजिक उपक्रमावर भर देण्यात आला होता. यावेळी गावागावातून पदाधिकारी मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.