संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

ओळी
-rat१८p२२.jpg ः P२३M१६९३१ खेड ः आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे तसेच सहाय्यक प्रशिक्षिका युगंधरा म्हामुनकर व सानिका बर्वे यांनी या विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले.

पाच विद्यार्थिंनींची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड
खेड ः येथील सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आयसीएस महाविद्यालयातील महिला विकास कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांच्या कालावधीत राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयातील २०० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यातील २६ विद्यार्थिंनींची पुढील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून, ५ विद्यार्थिनींची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये गायत्री कांबर, अनिशा निकम, प्राची निकम, रसिका नगरकर, गौरी गुजर या विद्यार्थिंनींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे तसेच सहाय्यक प्रशिक्षिका युगंधरा म्हामुणकर व सानिका बर्वे यांनी या विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले होते. सहजीवन शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंदराव भोसले, प्र. प्राचार्या प्रोफेसर डॉ. अनिता आवटी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वरील निवड झालेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.


पाच माध्यमिक शाळेत
शालोपयोगी साहित्य वाटप
साडवली ः समत्व ट्रस्ट ठाणे व बर्न मॅकडॉनल विक्रोळी यांच्यातर्फे संगमेश्वर तालुक्यातील पाच माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. करजुवे, तांबेडी, वांझोळे, कारभाटले, प्रचितगडमधील शाळांचा समावेश आहे. समत्वतर्फे गेली अनेक वर्ष हे वाटप होत आहे. शाळेच्या गरजा ओळखून वस्तूरूपातही वाटप केले आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत अनेक अडथळे येतात हे लक्षात घेऊन अशा शाळा संस्थेकडून निवडण्यात येतात, असे समत्वचे अध्यक्ष संतोष कांबळे यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष रूपेश कांबळे, रेश्मा वाजे, गणपत दाभोळकर, नरेंद्र खानविलकर उपस्थित होते.

-rat१८p२४.jpg-२३M१६९३५ मंडणगड ः संस्कार केंद्राचे उद्घाटन समारंभात बोलताना दिनेश पेडणेकर व कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.


दहागावला बालयोग संस्कार केंद्र सुरू
मंडणगड ः आर. के. फाउंडेशन संचालित कृषी ज्ञान प्रबोधिनी आणि आनंद विहार योगाश्रम तळघेर यांच्या संयुक्त विद्यमाने दहागाव निमदेवाडी येथे नुकतेच निसर्गवासी रामचंद्र धोंडू खाडे स्मृति बालयोग संस्कार केंद्राचा आरंभ निवृत्त पोलिस उपनिरीक्षक सहदेव म्हसकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आनंद विहार योगाश्रमाचे संचालक दिनेश पेडणेकर, सचिन थोरे उपस्थित होते. दिनेश पेडणेकर यांनी बालयोग सेवाश्रम म्हणजे काय हे विस्तृतपणे नमूद केले व ग्रामीण भागातील मुले व महिला व ज्येष्ठांकरिता किती महत्वाचे आहे याचे महत्व विषद केले. उद्घाटक सहदेव म्हसकर यांनी संस्कार केंद्राची गरज नमूद करताना प्रत्येक गावात असे केंद्र सुरू करून त्यातून चांगला माणूस घडण्याची प्रक्रिया सुरू व्हावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास प्रकाश भडवणकर, भिकाजी खाडे, रेश्मा जगताप, ग्रंथपाल पूजा दळवी, उपसरपंच रूपाली मोरे, समीर गांधी उपस्थित होते.


सावित्रीबाई फुले बचत गटाची सभा
मंडणगड ः दहागाव येथील सावित्रीबाई फुले स्वयंसहाय्यता बचतगटाची सर्वसाधारण सभा गटाचे प्रेरक सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गटाच्या सचिव स्वाती खाडे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि २०२२-२३ चा अहवाल सादर केला. गटाच्या खजिनदार रूपाली खाडे यांनी वार्षिक जमाखर्च, तेरीज पत्रक व नफापत्रक असे वाचन केले. बचतगटाचे एकूण शेअर्स १ लाख ३० हजार ३९० असून, २०२२-२३ साठी सभासदांना १२ टक्के इतका लाभांश वाटण्यात आला. गटाच्या सभासदाकडे थकित कर्ज नाही व वार्षिक उलाढाल ३ लाख ९४ हजार ३८५ असून ४५ हजार रुपये इतका निव्वळ नफा झाली. सावकारी कर्जातून मुक्तता होण्यासाठी या गटाची २० वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली आहे. महिलासांठी विविध प्रकारचे गृहोद्योग व उपक्रम राबवून आर्थिक उन्नतीबरोबर सामाजिक परिवर्तनाकडे गटाने वाटचाल सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.