-वाटदमध्ये वीर शिवा काशिद यांना आदरांजली

-वाटदमध्ये वीर शिवा काशिद यांना आदरांजली

२७ (पान २ साठी)


-rat१८p२५.jpg ः
२३M१६९५२
खंडाळा ः वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना सलून व्यावसायिक मित्रमंडळाचे सर्व सदस्य.
----------

वाटदमध्ये वीर शिवा काशिद यांना आदरांजली

पावस, ता. १८ ः रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे सलून व्यावसायिक मित्रमंडळातर्फे वीर शिवा काशिद यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक रूपेश उर्फ पवार स्वामी, सैतवडेचे सरपंच सागर कदम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पवार, रघुनाथ पवार तसेच सलून व्यवसाय संघटनेचे दत्ताराम भोसले, रोहित चव्हाण, प्रज्योत पवार, गौरव घाणेकर, विग्नेश पवार, नवनाथ कदम, संतोष पवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रुपेश पवार म्हणाले, आयुष्यात काय मिळाले यापेक्षा ते कसे मिळाले, हे आयुष्ययात सदैव आपल्या अंगी बाळगणारे वीर शिवा काशिद यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. समोर मृत्यू दिसत असतानाही काशीद यांनी मानसन्मान, पदप्रतिष्ठा, हारतुरे यापेक्षा स्वराज्यासाठी मरण पत्करले. त्यांच्या बलिदानाच्या जोरावर पुढे जाऊन अनेक वर्षांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या हिंदुस्तानवासियांना या गुलामगिरीतून मुक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य दूरवर नेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com