खेळ ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

खेळ ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

Published on

16992
बांदा ः गोगटे वाळके महाविद्यालयात कबड्डीपटू अनिल हळदीवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

खेळ ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

अनिल हळदिवे; बांद्यात जिमखाना विभागाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः स्वतःला सतत कामात गुंतवून घेत व्यस्त राहणे ही काळाची गरज ठरते आहे. कार्यरत माणसे सुखी समाधानी जीवन जगतात. शरीर ही मानवाची खरी संपत्ती आहे. ती संपत्ती आयुष्यभर जपण्यासाठी यासाठी विविध खेळांशी जोडले जा. खेळ जीवनात आनंद पेरण्याचे काम करतात. आनंदी जीवनाची खेळ ही खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन कणकवली येथील ज्येष्ठ कबड्डीपटू अनिल हळदिवे यांनी केले.
येथील गोगटे-वाळके कॉलेजमधील जिमखाना विभागाच्यावतीने कबड्डी महर्षी बुवा उर्फ शंकर साळवी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील जिमखाना विभागाचे उद्‍घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी श्री. हळदीवे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. वेल्हाळ होते. प्रारंभी जिमखाना विभाग प्रमुख प्रा. शरद शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. प्रा. वेल्हाळ म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डी हा खेळ नसानसात चैतन्य निर्माण करणारा आहे. या खेळामुळे महाराष्ट्राची जागतिक पातळीवर वेगळी ओळख आहे. मन, मनगट व मेंदू बळकट करण्याचे काम खेळ करतात. खेळातून सहनशीलता, सत्यप्रियता, समता आदी मूल्ये विकसित होतात. देशातील राज्यकर्त्यांनी खेळाला महत्त्वाचे स्थान देण्याची आवश्यकता आहे. भारतीय खेळाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी खेळांवर व खेळाडूंवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.’’ यावेळी तळेकर यांनी आपल्यासमोर निश्चित असे मोठे ध्येय ठेवून कार्यरत राहा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. येणारी आव्हाने पेलण्यासाठी व ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आताच्या पिढीने सजग राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कबड्डीपटू जे. डी. सावंत, जिमखाना सदस्य प्रा. डॉ. डी. जी. जोशी, प्रा. प्रसाद जाधव, जिमखाना विद्यार्थी प्रतिनिधी गणेश गवस आदी उपस्थित होते. जिमखाना सदस्य प्रा. रमाकांत गावडे यांनी सूत्रसंचालन केले. जिमखाना सदस्य प्रा. रश्मी काजरेकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.