किरीट सोमय्याची भाजपमधून हकालपट्टी करा

किरीट सोमय्याची भाजपमधून हकालपट्टी करा

Published on

३० (पान ५ साठीमेन)


-rat१८p३२.jpg-
२३M१६९६०
रत्नागिरी- भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओविरोधात ठाकरे सेनेने जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली.
------------

किरीट सोमय्यांची भाजपमधून हकालपट्टी करा

विलास चाळके ; अश्लिल व्हिडिओ विरोधात शिवसेनेची निदर्शने

रत्नागिरी, ता. १८ ः ज्या किरीट सोमय्याने शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांवर, मराठी माणसावर खोटे आरोप केले. या सोमय्याचे अनेक अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका बाजूला मराठी माणूस आणि विरोधी पक्षनेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करणाऱ्या सोमय्याचे आता खरे रूप जनतेपुढे आले आहे. आमची मागणी आहे, त्यांच्यावर गृहविभागाने कडक कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे अश्लिल संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून राज्यभरात प्रचंड गदारोळ सुरू आहे. ठाकरे शिवसेनेने सोमय्या यांच्या विरोधात जिल्हा संपर्क कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेही मारण्यात आले. यानंतर प्रतिक्रिया देताना विलास चाळके म्हणाले, बेटी बचाओचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षापासून आता बेटीला वाचवायला पाहिजे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. किरीट सोमय्यांनी आतापर्यंत शिवसेना, विरोधी पक्षनेते आणि मराठी माणसावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांना अनेक खोट्या केसेसमध्ये फसवले. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आमचे लक्ष आहे. सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

चौकट
किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओमुळे महाराष्ट्रभर गदारोळ माजला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. सोमय्यांनी मातोश्रीवर अनेक आरोप केले होते. कालाये तस्मै नम: या उक्तीप्रमाणे आता त्यांची वेळ आली आहे. त्यांच्या पापाचे घडे भरले. त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी संध्या कोसुंबकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.