दाभोळ-वळणेत काजू कलमांचे वाटप

दाभोळ-वळणेत काजू कलमांचे वाटप

Published on

फोटो ओळी
-rat१८p३८.jpg ः KOP२३M१६९९९ वळणे ः येथे काजू कलम वाटप करताना फाटक डेव्हलपर्सचे अक्षय फाटक.
--------------

वळणेत काजू कलमांचे वाटप
दाभोळ, ता. १८ ः दापोली येथील फाटक डेव्हलपर्स यांच्या वतीने वळणे येथे वेंगुर्ला ४ जातीची ६०० कलमे वाटपाचा कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. जालगांव येथील कामधेनू कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून आणि फाटक डेव्हलपर्स पुरस्कृत काजू कलमे विद्यापिठाच्या टेटवली प्रक्षेत्रावरून आणण्यात आली होती. उपसरपंच दिलीप घाणेकर, काळकाई देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश टेमकर, वाडीअध्यक्ष नितीन टेमकर, सल्लागार शंकर केंद्रे, लिंगावळे, दर्शना वरवडेकर, काष्टे उपस्थित होते. प्रस्तावना व सूत्रसंचालन कामधेनू कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले. फाटक डेव्हलपर्सचे अक्षय फाटक यांचा त्यांच्या अक्षय आराध्यवृक्ष रूई, राशी वृक्ष शिसम, शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
अक्षय फाटक यांच्या हस्ते रूईच्या रोपांची लागवड करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना काजू कलमे (प्रातिनिधिक) वाटप करण्यात आले. पुढील वर्षी याहीपेक्षा जास्त कलमे वाटप करण्यात येतील, असे सांगण्यात आले. या अभियानाचे नामकरण अक्षय कृषी संजिवनी अभियान असे केल्याबद्दल कामधेनू प्रतिष्ठानचे त्यांनी आभार मानले. दर्शना वरवडेकर यांनी अक्षय फाटक यांचे आभार व्यक्त न करता ऋणात राहण्याचे पसंत करेन, असे सांगितले. या वेळी वळणे येथे ६०० काजू कलमे व इतर ठिकाणी ४०० अशी १ हजार कलमे अक्षय कृषी संजिवनी अभियानांतर्गत वितरित करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.