सावंतवाडीत काँग्रेस बैठकीत 
कमिटी गठनाबाबत आढावा

सावंतवाडीत काँग्रेस बैठकीत कमिटी गठनाबाबत आढावा

Published on

सावंतवाडीत काँग्रेस बैठकीत
समिती गठनाबाबत आढावा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः सावंतवाडी तालुका काँग्रेस समितीची बैठक आज सकाळी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल सभागृहात तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
यावेळी काँग्रेस कमिटी गठित करणे व ग्राम कमिटी, बूथ कमिटी गठित करण्यासंदर्भात गाववार आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आपली भूमिका चोखपणे बजावत आहे. जनसामान्यांत काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोचवा, असे आवाहन यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सावंत यांनी केले. बैठकीला महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, राजू मसूरकर, रवींद्र म्हापसेकर, विभावरी सुकी, राघवेंद्र नार्वेकर, स्मिता वाघळे, समीर वंजारी, माया चिटणीस, जास्मीन लक्ष्मेश्वर, संभाजी सावंत, बाळा नमशी, विठ्ठल केदार, मायकल फर्नांडिस, गजानन राफकर, रविराज पेडणेकर, समीर भाट, अमिदी मेस्त्री, प्रमोद परब, प्रकाश बांदेकर, अरुण नाईक, कौस्तुभ पेडणेकर, गणेश मिरजकर, राकेश चितारी, मनोहर वेंगुर्लेकर, रफिक नाईक, चंद्रकांत राणे, राजेंद्र सावंत, अभय मालवणकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, आनंद कुंभार, सुधीर मल्हार, संजय लाड, रुपेश आईर, संतोष सावंत, सुमेघा सावंत, संतोष मडगावकर, बाबाजी राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.