क्राईम

क्राईम

शेतातील पॉवरटिलर पळवला
रत्नागिरी ः शेतात उभा करून ठेवलेला २५ हजाराचा पॉवरटिलर चोरट्याने पळवला. जयगड पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ते ३ जुलै या कालावधीत वरवडे-मराठवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी शेतात काम करण्यासाठी उभा करून ठेवलेला २५ हजाराचा पॉवरटिलर चोरट्याने पळवला. या प्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अंमलदार करत आहेत.

मद्यप्राशन करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः आठवडा बाजार येथील पालिकेच्या दुकान गाळ्याच्यामागे मद्य प्राशन करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस नाखरेकर व मंगेश शेट्ये अशी संशयितांची नावे आहे. या घटना सोमवारी (ता. १७) रात्री सव्वानऊच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशय़ित हे आठवडा बाजार येथील पालिकेच्या दुकान गाळ्यामागे मद्य प्राशन करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com