सोमय्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

सोमय्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Published on

17007
सावंतवाडी ः येथे भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.

सोमय्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

सावंतवाडीत घोषणाबाजी; भर पावसात आंदोलन

सावंतवाडी, ता. १८ ः भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित चित्रफितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात आज येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भर पावसात आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पोस्टरवर जोडे मारून व त्यांना नवीन कपडे नेसवून त्यांचा निषेध करण्यात आला. त्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे या घटनेचा ठपका ठेवून भाजपने सोमय्या यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी. तो व्हिडिओ मॉर्फ केला असेल तर त्यामागे नेमके कोण? याची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी येथे केली.
आज येथील गांधी चौक परिसरात राष्ट्रवादीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. युवती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सावली पाटकर म्हणाल्या, ‘‘नेहमी विरोधी गटाच्या नेत्यांवर सोमय्या यांनी टोकाची टीका केली आहे. त्यांच्याकडून झालेला प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत असून त्यांच्या विरोधात आम्ही जोडो मारो आंदोलन केले आहे.’’ पुंडलिक दळवी यांनी एका नेत्याकडून झालेला प्रकार अक्षम्य आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी तसेच त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष नझीर शेख, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी, तालुका उपाध्यक्ष समीर सातार्डेकर, जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तिकार राजगुरू, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया, सचिन पाटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गावडे, अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष एडवोकेट राबिया शेख आगा, महिला अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, सौ. पूजा दळवी, प्रांजल कदम, संगीता मिस्त्री आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.