चिपळूण-चिपळुणात एनडीआरएफ टीममार्फत रेकी सुरू

चिपळूण-चिपळुणात एनडीआरएफ टीममार्फत रेकी सुरू

Published on

फोटो ओळी
-RATCHL१८५.JPG--OP२३M१७०३५-चिपळूण ः कुंभार्ली घाटाची पाहणी करताना एनडीआरएफचे जवान.
-rat१८p४४.jpg- २३M१७०३४चिपळूण ः एनडीआरएफच्या या पथकात समावेश असलेली पिंकी कुत्री.
------------

चिपळुणात एनडीआरएफ टीममार्फत पहाणी सुरू

अतिवृष्टीसाठी सज्जता ; कुंभार्ली घाटातीतल धोकादाय ठिकांणाना भेट
चिपळूण, ता. १८ ः पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्याकरिता व मदतकार्य राबवण्याच्या पार्श्वभूमीवर येथे दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाने (एनडीआरएफ) धोकादायक ठिकाणी रेकी करण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी (ता.१८) चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात पाहणी करून तेथील परिस्थितीची पाहणी केली. हे पथक पुढील ३० ऑगस्टपर्यंत चिपळुणात मुक्काम ठोकणार आहे.
एनडीआरएफचे निरीक्षक अशोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली येथे झालेल्या २१ जवांनाच्या पथकाने ठिकठिकाणी रेकी करण्याचे काम सुरू केले आहे. या पथकात अनुभवी जवानांचा समावेश असून, त्यांनी मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणच्या आपत्कालीन परिस्थितीत काम केले आहे. मुळचे हरियाणा येथील असलेले अशोक कुमार यांनी देखील मुंबईतील कोसळलेल्या इमारतींच्या घटनेवेळी तसेच ठाण्यातील पूरपरिस्थितीत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. दोन दिवसांपूर्वी येथे दाखल झालेल्या या पथकाने आधी सर्व परिसराची माहिती घेतली. त्यानंतर आता प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन नदीकिनारे, रस्ते, घाटरस्ते व अन्य धोकादायक ठरणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यास सुरवात केली आहे. २१ जणांच्या या तुकडीमध्ये तीन अधिकारी आणि १८ जवानांचा समावेश आहे. या पथकाच्या माध्यमातून पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांच्याकडून मदतकार्य केले जाणार आहे. अशोक कुमार यांच्यासह रिषभ शर्मा आणि बीबीशान मोरे या अधिकाऱ्यांचा समावेश असून, सद्यःस्थितीत ते कापसाळ येथील विश्रामगृहात वास्तव्याला आहेत.
जुलै २०२१ मधील महापुराचा अंदाज घेऊन ही टीम काम करत आहे. त्यासाठी मंगळवारी कुंभार्ली घाटाची पाहणी केल्यानंतर बुधवारपासून वाशिष्ठी व शिवनदीच्या पात्राची पाहणी केली जाणार आहे. या पथकांकडे चार बोटीसह बचावकार्यासाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे. शहरी विभागात नगर पालिकेच्या मदतीने पाहणी केली जाणार आहे. विशेषतः चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीकिनाऱ्यारील पेठमाप, गोवळकोट, उक्ताड, मुरादपूर, शंकरवाडी व बाजारपेठ परिसरात बुधवारी दिवसभर रेकी केली जाणार आहे.


एनडीआरएफच्या दिमतीला पिंकी
एनडीआरएफच्या या पथकात एका लॅब्राडॉर जातीच्या कुत्रीचा समावेश आहे. पूर्ण शाकाहारी असलेली ही पिंकी नावाची कुत्री गेल्या दोन वर्षांपासून एनडीआरएफच्या पथकात कार्यरत आहे. आठ वर्षाची असलेली पिंकी एनडीआरएफच्या पथकात महत्वाची कामगिरी बजावत आहे. मुंबईसह राज्यभरातील अनेक घटनांमध्ये पिंकीने अनेकांचे जीव वाचवले आहेत. एखादा जिवंत माणूस जमिनीखाली गाडला गेला असला तरी त्याच्या वासाने पिंकी त्याचा अचूक शोध घेते. तिला एनडीआरएफचे जवान प्रवीण पाटील यांनी विशेष प्रशिक्षण दिले असून, या पथकाला तिचा मोठा आधार मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.