केंद्रीय मंत्री अमित मिश्रा 
आज वेंगुर्ले दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री अमित मिश्रा आज वेंगुर्ले दौऱ्यावर

Published on

17042
वेंगुर्ले ः पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रसन्ना देसाई. शेजारी इतर.

केंद्रीय मंत्री अमित मिश्रा
आज वेंगुर्लेच्या दौऱ्यावर
वेंगुर्ले, ता. १८ ः लोकसभा प्रवास योजना २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित मिश्रा उद्या (ता. १९) वेंगुर्ले दौऱ्यावर येत असून, ते परबवाडा बुथ नं. ५७ येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधणार आहेत. शहरातील विकासकामांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील तालुका भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस प्रदेश सचिव शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सरचिटणीस साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष सायमन आल्मेडा, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, परबवाडा उपसरपंच पपू परब आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री मिश्रा सायंकाळी चारला येथील नगरपरिषदेच्या स्वच्छ पर्यटन स्थळ व कलादालनास भेट देतील. पाचला परबवाडा बुथ नं. ५७ वर कार्यकर्त्यांशी संवाद बैठक, त्यानंतर शहरातील विविध विकासकामांना भेट देणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.