महिलेकडून झोपलेल्या वृद्धेचा खून

महिलेकडून झोपलेल्या वृद्धेचा खून

पान १ साठी

१६९९७
१७०४७


महिलेकडून झोपलेल्या वृद्धेचा खून
छातीवर केले प्रहार; ७८ हजार रुपयांच्या बोरमाळेसाठी केले कुकर्म
दाभोळ, ता. १८ ः तालुक्यातील विसापूर विश्रांतीनगर (मधलीवाडी) येथे झोपलेल्या वृद्धेच्या छातीवर प्रहार करून तिचा खून करून तिच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ चोरली. याप्रकरणी सृष्टी संतोष कदम (३७, रा. विसापूर मधलीवाडी) या महिलेला पोलिसांनी अटक केली. दरम्यान आज तिला दापोली येथील न्यायालयात हजर केले असता तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, संशयित महिलेचे वृद्धेच्या घरी येणे-जाणे असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील विसापूर विश्रांतीनगर (मधलीवाडी) येथे दीपावती सीताराम घाग या ८७ वर्षीय वृद्धा घरात एकटीच राहते. त्यांची मुले नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतात. त्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन कोणीतरी अनोळखीने त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या छातीवर जोराचा प्रहार करून त्यांचा खून केला. वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ चोरून नेली होती. या प्रकरणी काल दापोली पोलिस ठाण्यात प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात दीपावती घाग यांचे पुतणे सुधीर शांताराम घाग यांनी खबर दिली होती. दीपावती घाग या काल (ता. १७) सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात बेडवर बेशुद्धावस्थेत आढळून आल्या होत्या. दापोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता सृष्टी संतोष कदम (३७, रा. विसापूर मधलीवाडी) या महिलेवर पोलिसांनी संशय व्यक्त केला. तिची चौकशी केली असता प्रथम तिने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र त्यानंतर तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने दीपावती घाग हिला मारल्याचे कबूल केले. दीपावती घाग यांच्या गळ्यात असलेल्या ७८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बोरमाळेसाठीच हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या खुनाचा तपास दापोली पोलिसांनी अवघ्या १२ तासांत केला आहे. संशयित सृष्टी कदम हिच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा खून झाल्याची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, उपनिरीक्षक राजकुमार यादव, महेश पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण, हेडकॉन्स्टेबल अशोक गायकवाड, स्वप्नील शिवलकर, रूपाली ढोले, विधी जाधव, विकास पवार, विजेन्द्र सातर्डेकर, सूरज मोरे, पंकज पवार, सुहास पाटील, चालक नीलेश जाधव, शुभम रजपूत यांनी तपासकामी सहकार्य केले.

जानेवारी २०२२ मध्ये घटना
जानेवारी २०२२ मध्ये पालगडजवळील वणौशीतर्फे नातू येथे तीन महिलांना ठार मारून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेच्या दापोलीकरांच्या स्मृती वृद्धेच्या खुनाने ताज्या झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com