किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला

किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला

Published on

40 (पान 3 साठी)

वादातून दोघांना मारहाण

चिपळूण, ता. 18 ः घरगुती कारणातून दोघांना मारहाण केल्याचा प्रकार डेरवण चव्हाणवाडी येथे रविवारी (ता. 16) सायंकाळी घडला. या प्रकरणी दोन तरुणांविरूद्ध सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शुभम प्रदीप चव्हाण (23), दीपक श्रीराम चव्हाण (45) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील फिर्यादीचा शुभम हा नात्याने पुतण्या तर दीपक हा सख्खा भाऊ आहे. दीपक हा शुभम याच्याकडे राहण्यास असतो. यातील फिर्यादीला शुभम चव्हाण याने माझ्या वडिलांचा फोटो तुमच्या घरात का लावला? तो काढून टाका, असे सांगितले. त्यावर फिर्यादीने फोटो काढण्यास नकार दिला. त्याचा राग येऊन शुभम याने फिर्यादीच्या हातावर सुरीने वार करत जखमी केले. या वेळी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी पुढे गेलेल्या रोहित संजय चव्हाण याच्यावरही शुभम याने सुरीने हल्ला केला. यानंतर दीपक चव्हाण हा तेथे आला व त्याने फिर्यादी व श्रीराम चव्हाण यांना धमकी देत धक्काबुक्की केली तसेच फिर्यादीला दांडक्याने मारहाण करत त्यांच्या मालकीच्या रिक्षाची मागील काच, घरच्या स्लायडिंगच्या काचा, सिमेंटचा दरवाजा फोडून नुकसान केले. यात श्रीराम चव्हाण यांच्या हाताला दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.