रत्नागिरी-आठ नवजात शिशुना मिळाली नवदृष्टी

रत्नागिरी-आठ नवजात शिशुना मिळाली नवदृष्टी

Published on

फोटो ओळी
rat१८p४५.jpg- ३M१७०४६ रत्नागिरी ः दृष्टीदोष असलेल्या नवजात शिशूंना मिळाली नवदृष्टी.


... आणि आठ नवजात शिशुंना मिळाली नवदृष्टी

डॉ. संघमित्रा फुले ; विशेष नवजात फेअर युनिटचा फायदा

रत्नागिरी, ता. १८ ः जिल्हा शासकीय रुग्णालयातील विशेष नवजात फेअर युनिटमुळे (SNCU) डोळ्याचा दोष असलेल्या ८ नवजात शिशुंचे अंधत्व दूर करण्यास यश आले आहे. या दृष्टीहीन बालकांवर आरबीएसके आणि डीआयई या कार्यक्रमाअंतर्गत डॉ. प्रतिभा छडी (रेटिनातज्ज्ञ) यांनी तातडीने उपचार केल्याने आठ बालकांना नवदृष्टी मिळाली आहे.
नवजात शिशूच्या चाचण्या वेळेवर झाल्या तर त्यांच्यातील कायमचे अंधत्व दूर होऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अशा आठ नवजात बालकांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्याने त्यांच्यात येणारे कायचे अंधत्व दूर होऊन त्यांना नवदृष्टी मिळाली आहे. यात मध्यप्रदेशातील कामगाराच्या बालकाचा व रत्नागिरीतील बालकांचा समावेश आहे.
रत्नागिरीतील दोन महिलांची जिल्हा शासकीय रुग्णालयात नॉर्मल प्रसूती झाली तर मध्यप्रदेशातून कामानिमित्त दापोलीत आलेल्या एका कामगाराच्या पत्नीची दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नॉर्मल प्रसूती झाली होती. दोन किलोपेक्षा कमी वजन असल्याने या बाळाच्या रुग्णालयाच्या "डीईआयसी" कार्यक्रमाअंतर्गत कानासाठी ''ओएई'' आणि दृष्टीसाठी आरओबी या चाचण्या करण्यात आल्या. या वेळी या बालकांमध्ये तीव्र दृष्टिदोष आढळून आला. या बालकांना जिल्हा रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशू काळजी कक्षात (एसएनसीयू) ठेवून त्यांच्यावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य (आरबीएसके) आणि ''डीआय'' कार्यक्रमाअंतर्गत उपचार करण्याचा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी घेतला.
या शस्त्रक्रिया अवघड आणि आव्हानात्मक होत्या. त्यासाठी आवश्यक असलेले ११ हजार रुपयांचे इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही; मात्र महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून हे इंजेक्शन मोफत उपलब्ध झाले. आरबीएसके आणि डीआयई या कार्यक्रमाअंतर्गत डॉ. प्रतिभा छडी (रेटिनातज्ज्ञ) यांनी तातडीने या बालकांवर उपचार केले. त्यामुळे बालकांना कायमस्वरूपी अंधत्वातून वाचवणे शक्य झाले. या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केल्यानंतर काल त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. या वेळी या मातांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. या बाळांसाठी परिश्रम घेतलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय सूर्यगंध, एसएनसीयू इन्चार्ज सुवर्णा कदम तसेच जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे मातांनी आभार मानले.


कोट
या बालकांवर आरबीएसके आणि डीआयईअंतर्गत तत्काळ इंजेक्शन उपलब्ध होऊन योग्यवेळी उपचार मिळाल्यामुळे या बालकांना कायमस्वरूपी अंधत्व दूर झाले आहे. आतापर्यंत आठ नवजात बालकांना नवदृष्टी मिळाली आहे.
- डॉ. संघमित्रा फुले गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.