सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस

सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस

17072
सावंतवाडी ः शहरातील काही दुकानांच्या पायऱ्यांना पाणी लागले होते.
17073
सावंतवाडी ः शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते.
17074
सावंतवाडी ः दुचाकी अर्ध्याअधिक पाण्याखाली गेल्या.
17075
सावंतवाडी ः मोती तलावातील पाणी पातळीत वाढ झाली.

सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस

जनजीवन विस्कळीत; छोटे पूल पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः तालुक्याला आज पुन्हा मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गावागावातील नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत असून छोटे-मोठे पूलावरुन पाणी वाहत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, जयप्रकाश चौक ते चंदू भवन परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. काही दुचाकी अर्ध्याअधिक स्थितीत पाण्यात होत्या तर काही दुकानांच्या पायऱ्यांना पाणी लागले होते. पंचायत समिती परिसरात तब्बल गुडघाभर पाणी होते.
तालुक्यासह शहरात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. दुपारच्या सत्रात पावसाने प्रचंड जोर धरला. तब्बल ४ ते ५ तास मुसळधार पाऊस सुरु होता. या पावसामुळे आरपीडी हायस्कूलजवळील रस्त्यावर पाणी साचले होते. तेथील काही गाड्या अर्ध्याअधिक स्थितीत पाण्यात होत्या. शहरातील मुख्य बाजारपेठ, जयप्रकाश चौक ते चंदू भवन परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. पंचायत समिती परिसरात तब्बल गुडघाभर पाणी भरले होते. त्या परिसरातील नालेसफाई न झाल्याने हा प्रकार घडल्याचे तेथील नागरिकांना म्हणणे आहे. तसेच या मुसळधार पावसामुळे माठेवाड भागातील पिंपळाचे झाड कोसळून बाजूला असणाऱ्या हनुमान मंदिराची शेड पूर्णतः कोसळून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने मंदिराला कोणतेही नुकसान झालेले नाही. दरम्यान, गावागावातील नदी, नाले, ओहोळाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील बांदा, तळवडे, ओटवणे, कोलगाव, मळगाव, मळेवाड, आरोंदा येथील सखल भागात असलेले अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या तसेच शहरास गावात बत्ती गुल झाली होती. एकूणच या धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
-----------------
17076
म्हापण ः खालचीवाडी येथे घरावर पडलेले झाड.

वेंगुर्ले तालुक्याला
पावसाने झोडपले
वेंगुर्ले, ता. १८ ः सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने आज तालुक्याला झोडपून काढले. सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. यामुळे नदी, ओहोळांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तळवडे होडावडा मुख्य रस्त्यावरील नदीच्या पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. म्हापण खालचीवाडी येथील वासंती वसंत परब व चंदन राजाराम परब यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले असल्याची माहिती तालुका आपत्ती कक्षाकडून देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com