संक्षिप्त

संक्षिप्त

चिखल नांगरणी स्पर्धेत गाडे, गुरव प्रथम
लांजा ः तालुक्यातील पाळू येथे झालेल्या राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेत बाजारी बैलजोडीमध्ये पाळू येथील सागर गाडे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. गावठी प्रकारामध्ये बाबा गुरव (मार्लेश्वर) यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा पाळू देवमळा येथे झाली. गणपत गाडे यांच्या स्मरणार्थ उपसरपंच सागर गाडे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. द्वितीय क्रमांक निनाईदेवी प्रसन्न (शाहूवाडी जि. कोल्हापूर) तसेच तृतीय संजय सावंत (साठरे बांबर) यांनी मिळवला. गावठी बैलजोडी प्रकारात बावा गुरव (मार्लेश्वर), विकास कोलापटे (केळवली, लांजा), हेमा लांबोरे (गोविळ, ता. लांजा) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

फोटो ओळी
-rat25p3.jpg ः M18705
राजापूर ः व्यासपिठावर देवदत्त वालावलकर, मदन हजेरी, सुहास ओळकर, जयंत कदम, सुजाता रानाडे, पद्मजा कारेकर, दीपिका पवार.

राजापुरात नगर वाचनालयात वाचन सप्ताह
राजापूर ः येथील नगर वाचनालयात डिजिटल वाचन सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या अंतर्गत 14 ते 20 जुलै या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महाराष्ट्र बदलणारी पुस्तके या विभागाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. डॉ. अभय अळवणी यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. दुसऱ्या दिवशी विज्ञान आणि पर्यावरण या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. दर्जेदार नियतकालिके या प्रदर्शनाचे उद्घाटन सुजाता रानडे यांनी केले. महिलांचे आरोग्य आणि जगणं या विषयी डॉ. तृप्ती पाध्ये यांनी विचार मांडले. वाचनालयाचे अध्यक्ष देवदत्त वालावकर, कार्यवाह मदन हजेरी उपस्थित होते. वाचनालयात येणारी वृत्तपत्रे, मासिके आणि पुस्तके यांची माहिती त्यांनी दिली.

फोटो ओळी
-rat25p5.jpg 3M18707ः साडवली ः देवरूख पाध्ये स्कूलचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी.

शिष्यवृत्ती परीक्षेत पाध्ये स्कूलचे यश
साडवली ः शिष्यवृत्ती परीक्षेत देवरूख प्रसारक मंडळाच्या पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमधील 6 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा सन्मान प्राप्त केला. पाचवी मधील 4 विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृती प्राप्त झाली आहे. त्यामध्ये शाल्मली वाघमारे, आर्या कोळपे, आयुषी कुरलीकर, यशराज कटके याचा समावेश आहे तर प्रशालेच्या 8वी मधील 2 विद्यार्थिनींना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यामध्ये गायत्री बने, अनुष्का जाधव यांचा समावेश आहे. शालेय शिष्यवृत्तीमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळून पाध्ये इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्रशालेचे अध्यक्ष राजेंद्र राजवाडे, मुख्याध्यापिका सोनाली नारकर, दिक्षा खंडागळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

निकम विद्यालयात
अनुराधाताईंना आदरांजली
चिपळूण ः स्व. गोविंदरावजी निकम यांच्या खांद्याला खांदा लावून संस्था नावारूपाला आणण्यासाठी स्व. अनुराधाताई निकम यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांच्यातील अष्टपैलूत्व अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष कार्याद्वारे सिद्ध केले. शिक्षक म्हणून काम करत असताना स्वतःच्या पगारातून प्रपंच चालवत असताना गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, यावरती त्या ठाम होत्या, असे प्रतिपादन मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी केले. सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्व. अनुराधाताई निकम यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या वेळी उपमुख्याध्यापक विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर उपस्थित होते. अनुराधाताई निकम यांच्या जीवनावर आधारित समृद्धी साळुंके व सिद्धी सावंत यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन विजय काटे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com