ई-पिक नोंदीसाठीमुदतवाढीची मागणी

ई-पिक नोंदीसाठीमुदतवाढीची मागणी

Published on

M18804
देवगडः येथील तहसीलदार रमेश पवार यांची युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

ई-पिक नोंदीसाठी मुदतवाढीची मागणी
देवगडः पावसामुळे नेटवर्कमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे ई-पिक पाणी नोंदीबाबतच्या कालावधीमध्ये वाढ करून मिळावी, अशी मागणी येथील युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्यावतीने तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे करण्यात आली. तहसीलदारांची ठाकरे गट युवा सेनेच्यावतीने भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरिद काझी, नगरसेवक संतोष तारी, प्रवीण कावले, महेंद्र भुजबळ, तुषार धुरी, उदय करगुंटकर उपस्थित होते.
.........
वेंगुर्ले वाचनालयास लाखाची देणगी
वेंगुर्ले ः कोल्हापूर येथील अनंत विष्णू नाईक यांनी कुटुंबीयांसह नगर वाचनालय, वेंगुर्ले संस्थेच्या ग्रंथालयास भेट देऊन वाचनालयाच्या कामकाजाची पाहणी केली. संस्थेचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. नाईक यांनी आपले वडील विष्णू गणेश नाईक व पत्नी जयश्री अनंत नाईक यांच्या स्मरणार्थ संस्थेस एक लाख रुपयांची देणगी दिली. विष्णू नाईक यांनी १९६१-१९६२ या कालावधीत नगर वाचनालयाचे उपकार्यवाह म्हणून आणि त्यानंतर १९६३ ते १९८३ पर्यंत संस्थेचे कार्यवाह म्हणून कामकाज पाहिले. नगर वाचनालयाच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. नाईक यांनी दिलेल्या देणगीबद्दल कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.