सुगम संगीत स्पर्धा

सुगम संगीत स्पर्धा

वरवडे येथे जिल्हास्तरीय
श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धा
कणकवली, ता. २६ ः आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, वरवडे व डॉ. राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा पाचवी ते आठवी, ९ वी ते १२ वी आणि खुला गट अशा तीन गटात होणार आहे. तिन्ही गटांना भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, गझल यापैकी एक गाणे ५ मिनिटे सादर करायचे आहे.
विजेत्यांना अनुक्रमे पहिला गट ः १५००, १००० आणि ८०० रुपये व चषक, दुसऱ्या गटासाठी २५००, २००० आणि १००० हजार व चषक, खुला गट ः २५००, २००० आणि १५०० रुपये व चषक असे बक्षीस आहे. ही एकल गायन स्पर्धा आहे. गाणे सादर करण्याची वेळ ५ मिनिटे असेल. सहभागी स्पर्धकांनी आपली नावे १६ ऑगस्टपर्यंत पाठवावीत. वादक व वाद्ये उपलब्ध होतील. प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. अंतिम फेरीदिवशी स्पर्धकांची भोजनाची व्यवस्था केली जाईल. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील. नावनोंदणीसाठी आयडियल स्कूलमध्ये संपर्क साधावा. प्रथम फेरी ः २० ऑॅगस्टला सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत. प्रथम फेरीमध्ये पसंतीच्या एका गाण्याचा एक अंतरा सादर करावा लागेल. अंतिम फेरी दोन सप्टेंबरला होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com