विमाधारकांना सरसकट भरपाई द्या

विमाधारकांना सरसकट भरपाई द्या

18989
वेंगुर्ले ः पीक विमा रकमेबाबत तहसीलदार ओंकार ओतारी यांना आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

विमाधारकांना सरसकट भरपाई द्या

आंबा बागायदारांची मागणी; वेंगुर्लेत तहसीलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २६ ः वेंगुर्ले शहर सर्कलमध्ये येणाऱ्या आंबा बागायदार शेतकऱ्यांवर पीक विमा कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेबाबत अन्याय होत आहे, असा आरोप करत वेंगुर्ले सर्कलमध्ये येणाऱ्या गावांना ३७ अंश सेल्सिअस तापमानात गृहित धरावे. यावर्षी उष्णतेमुळे मिळणारी नुकसान भरपाई हेक्टरी ५६ हजार रुपये एवढी असून ती विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट मिळावी; अन्यथा शेतकरी बागायतदारांतर्फे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी प्रशासनास दिला. याबाबत तहसीलदार ओंकार ओतारी यांची आज भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे, की वेंगुर्ले सर्कलचे तापमान मोजमाप यंत्र तहसीलदार कार्यालय येथे असून ते सध्या बंद आहे. येथील फळ संशोधन केंद्रातील तापमान मोजमाप यंत्र गतवर्षी एप्रिलमध्ये बंद होते. त्यामुळे विमा कंपनीकडून येथील आंबा-काजू बागायतदारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यावर्षी ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान झाले होते. वेंगुर्ले सर्कललगतच्या मातोंड व वेतोरे सर्कल येथे सतत १० दिवसांपेक्षा अधिक काळ ३७ अंश सेल्सिअस तापमान आढळले आहे. सतत ६ दिवसांपेक्षा अधिक तापमान आढळल्यास ५६ हजार रुपये विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे, याकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, यावेळी आंबा बागायतदार शेतकरी ललितकुमार ठाकूर, संजय गावडे, बबन साळगावकर, वाल्मिकी कुबल, अमेय नवार, युवराज ठाकूर, बापू गावडे, अनिल गावडे, ज्ञानेश्वर अणसूरकर, दीपक आईर, प्रभाकर ठाकूर, विजय ठाकूर, पांडुरंग गावडे, सुरेश ठाकूर, सुभाष बोवलेकर, सुनील बोवलेकर, दिनेश गावडे, भास्कर गावडे, सहदेव ठाकूर, रवींद्र ठाकूर आदी उपस्थित होते.
---
चौकट
यंदा उष्माघाताचा फळांना फटका
यावर्षी प्रचंड उष्माघातामुळे बागेतील फळांची अतोनात फळ गळती होऊन आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ले सर्कलमधील गावांना ३७ अंश सेल्सिअस तापमानात गृहित धरून चालू वर्षी उष्णतेमुळे मिळणारी हेक्टरी ५६ हजार रुपये नुकसानभरपाई विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट मिळावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी बागायतदार १५ ऑगस्टला आंदोलन छेडतील, असे निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com