दोडामार्गात सर्वाधिक
८४.६ मि.मी. पाऊस

दोडामार्गात सर्वाधिक ८४.६ मि.मी. पाऊस

Published on

दोडामार्गात सर्वाधिक
८४.६ मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात चोवीस तासांत दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ८४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ६५.४ मि.मी. पाऊस झाला असून, एकूण सरासरी १९८७.३ मि.मी. पाऊस झाला. तालुका निहाय पावसाची आकडेवारी (सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात) अशी ः देवगड- ५०.१ (१६४६.५), मालवण- ५३.८ (१९३४.७), सावंतवाडी- ८३.२ (२३९३.२), वेंगुर्ले- ४८.० (२००९.९), कणकवली- ६९.२ (१८०३.८), कुडाळ- ७५.३ (२१२१.६), वैभववाडी- ७६.८ (१९४६.६), दोडामार्ग- ८४.६ (२३५२.१).
................
सावंतवाडीत शनिवारी
‘गाणी बाबूजींची’
सावंतवाडी ः सावंतवाडीत संगीत मित्रमंडळाच्या सभासद कलाकारांमार्फत गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या पुण्यस्मरणार्थ शनिवारी (ता. २९) सायंकाळी ५.३० वाजता ‘गाणी बाबूजींची’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम येथील श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचा रसिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर यांनी केले आहे.
--
सावंतवाडीत आज
‘नॅब’चे आंदोलन
सावंतवाडी ः येथील नेत्र रुग्णालयासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्यास पालिका प्रशासनाकडून चालढकलपणा होत असल्याने नॅब रुग्णालयाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या विरोधात उद्या (ता. २७) छेडण्यात येणाऱ्या जन आक्रोश आंदोलनात सामाजिक बांधिलकी मांडणाऱ्या जनतेने तसेच नॅबच्या लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी केले आहे.
---
वायरीत रक्तदान
शिबिराचे आयोजन
मालवण : दीप्ती प्रभाकर लुडबे यांच्या स्मरणार्थ ६ ऑगस्टला सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत शहरातील वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी नारायण लुडबे, वैभव लुडबे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...............
कोळंबला रविवारी
नेत्र चिकित्सा
मालवण : डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय आणि कोळंब ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने कोळंब ग्रामपंचायत येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर ३० जुलैला दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित केले आहे. शिबिरात कॉम्प्युटरद्वारे नेत्रचिकित्सा केली जाणार असून, मोतिबिंदू व डोळ्यांच्या इतर आजारांबाबत निदान केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय व सरपंच सीया धुरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.