सरंबळमध्ये खचलेल्या डोंगराबाबत उपाय

सरंबळमध्ये खचलेल्या डोंगराबाबत उपाय

Published on

18986
सिंधुदुर्गनगरी ः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देताना सरंबळ-देऊळवाडी ग्रामस्थांसोबत रणजित देसाई.


सरंबळमध्ये खचलेल्या डोंगराबाबत उपाय

पालकमंत्र्यांची ग्वाही; रस्त्यावरील भराव मोकळा करणार

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः सरंबळ-देऊळवाडी येथील खचलेल्या डोंगराचा भराव रस्त्यावर आला आहे. तो तातडीने जेसीबी लावून मोकळा करून त्या ठिकाणी गटार खोदण्याचे काम उद्या (ता.२७) सकाळी सुरू होणार आहे. यावर्षीच्या नियोजन समितीच्या आराखड्यांमधून त्या ठिकाणी संरक्षक भिंतीच्या कामाला मान्यता देऊन काम सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या उपस्थितीत येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री चव्हाण यांची भेट घेत मागणी केली होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अनिल आवटी यांची माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरंबळ- देऊळवाडी तसेच नेरूर-कांडरीवाडी येथील ग्रामस्थांनी भेट घेतली. यावेळी नेरूर-कांडरीवाडी येथील कोसळलेला डोंगर व कुडाळ नेरुर वालावल चेंदवण कवठी रस्त्यावरील नेरुर कन्याशाळा येथील मोरी नूतनीकरण करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागास तातडीने कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, सौ. संध्या तेरसे, बंड्या सावंत, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, रुपेश कानडे, पप्पू तवटे, सरंबळ सरपंच रावजी कदम, उपसरपंच सागर परब, अमोल कदम, माजी सरपंच अजय कदम, सुशिल कदम, बाळाजी कदम, श्रावण जाधव, ग्रामपंचायत सदस्य महेश सरंबळकर, बंटी गोसावी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.