संत रोहिदास पतसंस्थेची
सावंतवाडीत वार्षिक सभा

संत रोहिदास पतसंस्थेची सावंतवाडीत वार्षिक सभा

Published on

१८९९१
संत रोहिदास पतसंस्थेची
सावंतवाडीत वार्षिक सभा
सावंतवाडी ः येथील श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना नऊ टक्के दराने नफा देण्याची घोषणा पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद वाडकर यांनी विसाव्या वार्षिक बैठकीमध्ये केली. संस्थेला साडेचार लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे यावेळी वाडकर यांनी सांगितले. येथील समाज मंदिर सभागृहामध्ये पतसंस्थेच्या सभासदांची वार्षिक बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष बाबूराव चव्हाण, संचालक गणेश म्हापणकर, प्रकाश रेडकर, मंगेश कदम, भरत लाखे, व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांच्यासह उमाकांत वारंग, लाडू जाधव, मनोहर वेंगुर्लेकर, संजना आंबेडकर, दशरथ वाडकर, तृप्ती गावडे, नारायण केसरकर आदी कार्यकारिणी पदाधिकारी, ठेवीदार कर्मचारी आणि हितचिंतक उपस्थित होते. सभेत शेष तपासनीस नियुक्ती करण्याबाबत ठराव करण्यात आला. विविध विषयांवर चर्चा झाली.

१८९९२
स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये
विद्यार्थ्यांना समुपदेशन
सावंतवाडी ः येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक विकासावर आधारित समुपदेशन करण्यात आले. पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा ''सुरवंटापासून ते फुलपाखरा''पर्यंत होणारा प्रवास, त्यांच्या शारीरिक व मनसिक बदलांना अनुसरून समुपदेशन करण्यात आले. सर्व तज्ज्ञांचे व शाळेचे संचालक रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका दिशा कामत यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. समुपदेशक मानसविकारतज्ज्ञ डॉ. मोहिनी वज्राटकर व स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये, डॉ. भक्ती सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांना या शारीरिक व मानसिक बदलांतून जाताना ते बदल स्वीकारून आपले ध्येय कसे गाठावे, हे स्पष्ट करून सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.