छप्पर

छप्पर

-rat२४p४५.jpg ः
२३M१८५५८
राजापूर ः दैनंदिन छप्परपट्टी आकारणीबाबत फेरविचार करावा, या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना देताना हनिफ मुसा काझी. या प्रसंगी सौरभ खडपे, संजय ओगले आदी.
----------

छप्परपट्टी आकारणीचा फेरविचार करा

हनिफ काझी ; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

राजापूर, ता. २६ ः शहराची भौगोलीक रचना, व्यावसायिक आर्थिक मंदीच्या परिस्थितीचा विचार करता शहरात छप्परपट्टी भरून छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्‍या व्यावसायिकांना दैनंदिन छप्परपट्टी भरणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे दैनंदीन छप्परपट्टी आकारणीच्या निर्णयावर प्रशासनाने सुवर्णमध्ये काढून हा वाढीव दैनंदिन छप्परपट्टी आकारणीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी आज मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना दिले आहे. या वेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक सौरभ खडपे आणि संजय ओगले आदी उपस्थित होते. छप्परपट्टी आकारणीसंबंधित व्यापाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आलेल्या हरकतींवर चर्चा करून नक्कीच योग्य तो निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्याधिकारी भोसले यांनी यावेळी दिली. नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी नगर पालिकेकडून छप्परपट्टी धारकांकडून दैनंदिन कर आकारणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत छप्परपट्टी धारकांना नगर पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यासंबंधी माजी नगराध्यक्ष काझी यांनी मुख्याधिकारी भोसले यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com