‘दर्पण’तर्फे लवकरच करिअर मार्गदर्शन वर्ग

‘दर्पण’तर्फे लवकरच करिअर मार्गदर्शन वर्ग

Published on

19049
कणकवली : येथील कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर निवड झालेल्‍या प्रा.सोमनाथ कदम यांचा सत्‍कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

‘दर्पण’तर्फे लवकरच करिअर मार्गदर्शन वर्ग

आनंद तांबे; कवी उत्तम पवार यांना स्मृतीदिनी अभिवादन

कणकवली, ता.२६ : दहावी, बारावी नंतर इथल्‍या मुलांना योग्‍य करिअर निवडता यावे यासाठी दर्पण प्रबोधिनीतर्फे करिअर मार्गदर्शन वर्ग तसेच व्यक्‍तिमत्व विकास शिबिर सुरू केले जाणार आहे, अशी माहिती दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी दिली.
कवी आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम पवार यांचा सातवा स्मृतीदिन कार्यक्रम संस्थेच्या सभागृहात झाला. यावेळी आनंद तांबे यांनी मनोगत मांडले. ते म्‍हणाले, की सामाजिक परिवर्तनाचा ध्यास बाळगणारा सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता, विद्रोही कवी आणि संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार स्मृतिदिन आम्‍ही संकल्‍पदिन म्‍हणून साजरा करत आहोत. यात यंदा करिअर मार्गदर्शन वर्ग सुरू केले जाणार आहेत.
दर्पण संस्थेचे प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी उत्तम पवार यांचे सामाजिक, साहित्यिक कार्य पुढे नेण्यासाठी नवोदित लेखक, कवींसाठी लेखन कार्यशाळा आयोजित केली जाणार असल्‍याची माहिती दिली. त्यानंतर संस्थेचे प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, निवृत्त जिल्हाधिकारी सुरेश कदम, डॉ. अशोक कदम, डा. व्ही. जी. कदम, संतोष तांबे यांनीही संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक उपक्रमांना सक्रिय आर्थिक योगदान देण्याची ग्‍वाही दिली. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य कवी प्रा. सिद्धार्थ तांबे यांनी संस्थेच्या प्रबुद्ध ग्रंथालयाला दरवर्षी किमान दहा पुस्तके देण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमात उत्तम पवार स्मृती विद्यार्थी शिष्यवृत्ती मंथन महेश तांबे (मसुरे, मालवण) आणि आयुष मिलिंद साळसकर (कसवण, कणकवली) विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. संस्थेचे किशोर कदम यांनी दरवर्षी एका गरीब, होतकरू विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक प्रोत्साहनपर एक हजार रुपये देण्याचा संकल्प केला. यात त्‍यांच्याहस्ते सरोज संजय कदम (कुवळे,देवगड) या होतकरू विद्यार्थिनीला शैक्षणिक सहाय्य दिले.
कार्यक्रमात शिष्यवृत्ती, दहावी, बारावी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या तसेच विविध पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्‍कार करण्यात आला. यात अनोन्य अनिल तांबे, सार्थक संगम कदम (शिष्यवृत्ती), अनुज सुधीर तांबे (बी.आर्किटेक्ट), सानिका संगम कदम (नीट परीक्षेत उज्वल यश), मिथिलेश सुगंध तांबे ( बी.ई.सिव्हिल), सानिका सतिश कदम (हॉटेल मॅनेजमेंट, अमेरिका निवड), स्वराली राजेश कदम (ऑलिम्पियाड सायन्स यश), आर्या किशोर कदम (राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय) यांचा सत्‍कार झाला. शिवाय मुंबई विद्यापीठ सिनेटवर निवड झालेले प्रा. डॉ. सोमनाथ कदम, निलम उत्तम पवार (पोलिस क्षेत्रात विशेष कार्य), सुदीन तांबे (मालिका, चित्रपट अभिनेता, गायक), प्रा.सिद्धार्थ तांबे (राज्यस्तरीय काव्यपुरस्कार प्राप्त), स्नेहल सुनील तांबे (राज्यस्तरीय काव्यपुरस्कार प्रायोजकत्व) आदींना गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.