संक्षिप्त

संक्षिप्त

१४ (पान २ साठी, संक्षिप्त)


-rat२५p७.jpg ः
२३M१८७०९
गावतळे ः पंचपदी शाळेस पुस्तके भेट देत असताना पूजा हिरेमठ.
-------------
पंचनदी हायस्कूलला पुस्तकांची देणगी

गावतळे ः दापोली तालुक्यातील दाभोळ पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्याकडून यशवंत कुटरेकर विद्यालय पंचपदी शाळेस स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची देणगी देण्यात आली. पोलिस ठाणे दाभोळ येथून नुकत्याच एस. पी. ऑफिस सिंधुदुर्ग येथे रूजू झालेल्या पूजा हिरेमठ यांनी स्वतः ज्या पुस्तकांचा अभ्यास करून उच्च पदापर्यंत झेप घेतली त्याचा लाभ कोकणातील युवक-युवतींना व्हावा व कोकणातून अधिकारी घडावेत याकरिता त्यांच्याकडील विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या ३० पुस्तकांचा संच शाळेस भेट दिला. संस्थाध्यक्ष हरिश्चंद्र कुटरेकर, संस्थासदस्य व पंचनदी गावचे पोलिस पाटील उत्तम येलवे, प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील देसाई व सेवक अजय वायंगणकर यांच्या उपस्थितीत संस्थेकडे प्रदान करण्यात आला. या पुस्तकांचा वापर शाळेकडून निश्चितच केला जाईल याची खात्री असल्याची बाब आवर्जून देणगी देताना त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
---------------

-------------

-rat२५p१७.jpg ः
२३M१८७२७
लांजा ः शिक्षक समिती वर्धापनदिनानिमित्त महिलाश्रमात खाऊवाटप करण्यात आले.
-----------

लांजा महिलाश्रमात शालेय साहित्य वाटप

लांजा ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६१व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने संघटनेच्या तालुका शाखा लांजाच्यावतीने (कै.) सौ. जानकीबाई (आक्काबाई) तेंडुलकर महिलाश्रम येथे खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच महिलाश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी शिक्षक समिती तालुकाध्यक्ष उमेश केसरकर, शिक्षकनेते शंकर रणदिवे, सचिव विजय कदम, बालगृह अधिक्षका सायली वाघधरे, सहशिक्षिका अनुजा कांबळे आदी शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. परिसरात नारळीच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. निवेदन सचिव विजय कदम यांनी केले व आभार अनुजा कांबळे यांनी मानले.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com