मणिपूरमधील घटनेचा कणवलीत निषेध

मणिपूरमधील घटनेचा कणवलीत निषेध

19085
कणकवली : येथील तहसील कार्यालयासमोर आशा वर्कर्स संघटनेतर्फे निषेध व्यक्‍त करून घोषणाबाजी केली.


मणिपूरमधील घटनेचा कणवलीत निषेध

आशा वर्कर्स आक्रमक; तहसीलदारांना दिले निवेदन

कणकवली, ता.२६ : मणिपूर येथे सुरू असलेल्‍या हिंसाचारात महिलांची विवस्त्र धिंड आणि सामुहिक बलात्‍कार प्रकरणाचा आज कणकवलीत आशा वर्कर्स युनियनतर्फे निषेध करण्यात आला. मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयासमोर आशा वर्कर्स युनियनच्या महिलांनी घोषणाबाजी केली. त्‍यानंतर तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन देण्यात आले.
आशा वर्कर्स युनियनच्या प्रियांका तावडे, मनस्वी गावकर, साक्षी सावंत, साक्षी परब, किरण घाडीगावकर, व्ही. व्ही. पाटील, सुनीता पवार, क्षितीजा कदम, दीप्ती लाड, दुर्वा म्‍हाडेश्‍वर आदींनी तहसील कार्यालयासमोर येऊन मणिपूर येथील हिंसाचार आणि सामुहिक बलात्‍कार प्रकरणाचा निषेध केला. त्‍यानंतर अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन कणकवली कमिटीतर्फे तहसीलदार श्री.पवार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदात म्‍हटले आहे, की मणिपूर येथे ३ मे रोजी हिंसाचार सुरू होऊन अडीच महिने उलटले तरीही सशस्त्र चकमकी, हत्‍या आणि जाळपोळाचे सत्र सुरू आहे. या हिंसाचारात महिला आणि सर्वसामान्य जनता होरपळत आहे. इंफाळमधील केंद्रीय राज्‍यमंत्र्यांचेही घर आगीतून सुटले नाही. केंद्रीय पोलिस सशस्त्र दल तैनात असूनही मैतेई आणि कुकी गटात संघर्ष सुरू आहे. या प्रकरणी मणिपूरचे मुख्यमंत्री विरेन सिंग यांनी राजीनामा द्यावा. सर्व दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि शांतता प्रस्थापित होण्यासाठी उपाययोजना केल्‍या जाव्यात, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com